The tremendous benefits of eating pistachio Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pistachio खाण्याचे '5' जबरदस्त फायदे

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पिस्ता गुणकारी ठरू शकतो.

दैनिक गोमन्तक

पिस्ता (Pistachio) हा सुकमेवामधील एक प्रकार आहे. यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे अ, के, सी, बी -6, डी आणि ई, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, यासारखे पोषक तत्वे असतात. याचे सेवन केल्याने ह्रदयचे आरोग्य (Health) चांगले राहते. तसेच कॅलरी कमी होऊन लठ्ठपणा कमी होतो. याचे सेवन तुम्ही दुधात टाकून किंवा खीरमध्ये टाकून करू शकता. चल तर मग जाणून घेवूया पिस्ताचे (Pistachio) जबरदस्त फायदे.

* स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते

आजकाल विसरभोळेपणा ही समस्या अनेक लोकांमध्ये आढळून येत आहे. ही समस्या सामान्य मानून चालणार नाही. कारण याचा दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पिस्ता गुणकारी ठरू शकतो. पिस्तामध्ये (Pistachio) अनेक पोषक घटक असतात. यामुळे मेंदूचे कार्य सुधारून अधिक सक्रिय बनते.

* हृदयाचे आरोग्य चांगले राहते

पिस्ता खाल्ल्याने (Pistachio) हृदयाचे आरोग्य चांगले राहते. नियमितपणे पिस्ता खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो. हृदया संबंधित असेलेल आजार दूर राहतात. हृदय विकार असलेल्या लोकांनी पिस्ताचे सेवन करावे.

* कर्करोगापासून बचाव

अनेक संशोधनानंतर असे समोर आले की पिस्ता (Pistachio) खाल्ल्याने कर्करोगापासून बचाव होतो. यात कर्करोगाशी लढण्यासाठी पोषक घटक असतात. जे कर्करोगापासून बचाव करतात. कर्करोग असलेल्या लोकांसाठी पिस्ताचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

* हाडे मजबूत राहतात

पिस्ता (Pistachio) खाल्ल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. यात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे मुबलक प्रमाण असते यामुळे हांडे मजबूत राहण्यास मदत मिळते. नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो.

* इतर फायदे

  • पिस्ता हा उष्ण पदर्थ आहे. यामुळे त्याचे सेवन हिवाळ्यात केळल्यास आरोग्याला फायदा होतो. पण उन्हाळ्यात सेवन करणे टाळावे. अन्यथा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • पिस्ताचे अतिसेवण केल्यास किडणीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे पिस्ताचे अतिसेवण टाळावे.

  • पिस्ता अधिक खाल्ल्याने डायरिया होण्याची शक्यता असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT