Tea Time Snacks: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea Time Snacks: हिवाळ्यात चहासोबत घ्या 'या' 3 चविष्ट भजींचा आस्वाद

फक्त पावसाळ्यातच नाही तर हिवाळ्यासुद्धा लोक चहासोबत भजी खातात. हिवाळ्यात कोणत्या भजींचा आस्वाद घ्यावा हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Tea Time Snacks: अनेक लोकांना पावसाळा असो की हिवाळा भजी खायला आवडतात. गुलाबी थंडीत गरमागरम चहा आणि कुरकुरे भजी खाण्याची मज्जाच वेगळी असते. जे लोक एक प्लेट भजी खाणार आहेत, त्यांना कळत नकळत दोन ते तीन प्लेट भजी खातात. भजी हे कांदा, बटाटेपासून बनवतात तर हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या हंगामी भाज्यांपासून देखील बनवतात.

  • पालक भजी

हिवाळ्यात पालक खाणे आरोग्यदायी असते. तुम्ही पालक भजींचा चहासोबत आस्वाद घेऊ शकता. हे बनवण्यासाठी एका भांड्यात बेसन, कॉर्न फ्लोअर, ओवा, मीठ आणि तिखट घालून मिक्स करावे. भजी बनवण्यासाठी पालकाची पाने कापू नका तर देठ तोडून स्वच्छ पाण्याने धुवा आणि पाणी पुसल्यानंतर बाजूला ठेवा. आता पाने बेसनच्या पिठात बुडवा, चांगले कोट करा, गरम तेलात घाला आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळावे. तुम्ही केचप आणि गोड चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करू शकता.

लाल माठ

लाल माठ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लाल माठपासून भजी बनवण्यासाठी पहिले लाल माठाची पान व्यवस्थित चिरून घ्यावे. आता बारिक चिरलेला लाल माठामध्ये बेसन, कांदा, मीठ, हिरवी मिरची आणि थोडासा बेकिंग सोडा घालून मिक्स करावे. नंतर बेसन मिक्स करून पाणी घालून 10-15 मिनिटे तसेच ठेवावे. तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात सोनेरी होईपर्यंत भजे तळावे. तळल्यानंतर चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

मेथीचे भजी

हिवाळ्यात पालेभाज्या बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात. तुम्ही मेथापासून स्वादिष्ट भजी तयार करू शकता. यासाठी मेथाची पाने कापून एका भांड्यात ठेवावे, त्यात बेसन, बारीक चिरलेला कांदा, हिरवी धणे, लिंबू, मिरची आणि संपूर्ण धणे घालून मिक्स करावे. भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यात कॉर्न किंवा तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करून अर्धा तास ठेवावे. आता गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भजी तळावे. गरमागरम चहा, चटणी आणि सॉससोबत सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT