Paneer Cheese Toast  Dainik Gomanbtak
लाइफस्टाइल

Paneer Cheese Toast Recipe: मुलांसाठी स्नॅक्समध्ये झटपट बनवू शकता टेस्टी पनीर चीज टोस्ट

जेव्हा मुलांना अचानक भूक लागते तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी टेस्टी पनीर चीज टोस्ट बनवू शकता.

दैनिक गोमन्तक

Paneer Cheese Toast Recipe For Kids: अनेक महिलांना लहान मुलांसाठी काय बनवावे हा प्रश्न पडतोच. वाढत्या वयात मुलांना सारकी भुक लागते. लहान मुल प्रत्येकवेळी काहीतरी नव्या पदार्थांची मागणी करतात.

जर लहान मुलांना संध्याकाळी भुक लागली असेल तर तुम्हा त्यांच्यासाठी चविष्ट पनीर टोस्ट तयार करु शकता. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा असुन झटपट तयार होतो. दुसरीकडे पनीर आणि चीज दोन्ही मुलांचे आवडते असतात, म्हणून ते देखील ही डिश मोठ्या आवडीने खातात.

  • पनीर चीज टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- पनीर

- चीज

- बटर

- ब्रेड स्लाइस

- कांदा

- शेजवान सॉस

- मेयोनिज

- काळी मिरी पावडर

- चिली फ्लेक्स

- ओरेगॅनो

- मीठ

  • बनवण्याची पद्धत

पनीर चीज टोस्ट बनवण्यासाठी प्रथम पनीरचे लहान चौकोनी तुकडे करावे.

कांदाही बारीक चिरून घ्यावा.

नतंर एका बाऊलमध्ये कांदा आणि पनीर मिक्स करावे.

नंतर त्यात शेजवान सॉस आणि मेयोनिज मिक्स करावे.

त्यात मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि चीज घालून पुन्हा मिक्स करावे.

आता ब्रेड घ्या आणि त्यावर ही पेस्ट चांगली पसरवी.

वरून किसलेले चीज घालावे. 

तव्यावर बटर लावून त्यावर ब्रेड स्लाईस ठेवावी.

झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे शिजवा.

तुमची टेस्टी पनीर चीज टोस्ट तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT