Tasty Food Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tasty Food: नाश्तासाठी झटपट बनवा 'या' 6 टेस्टी रेसिपी

Tasty Food: आरोग्यासाठी पौष्टिक असणाऱ्या पदार्थांचा नाश्तामध्ये समावेश करावा.

दैनिक गोमन्तक
Food

Tasty Food:

रोज नाश्तासाठी काय बनवावं? हा सगळ्या महिलांना पडणारा कॉमन प्रश्न आहे. भरपूर नाश्ता करणे उत्तम आरोग्यासाठी गरजेचे आहे, असं आहार तज्ञ कायम सांगतात.नाश्ता केल्यामुळे रिकाम्या पोटात अन्न जाऊन शरीराला ऊर्जा मिळते. पण रोज तोच तो नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर आम्ही तुम्हाला काही चवदार, सोप्या रेसिपी सांगणार आहोत.

Pohe
  • कांदा- बटाटा पोहे

    रोजच्या पोह्यांपेक्षा तुम्ही जरा वेगळ्या प्रकारे बनवले जाणारे हे पोहे ट्राय करु शकता. बटाट्याचे छोटे काप करुन ते छान वाफवून घ्यावेत. नेहमी बनवल्या जाणाऱ्या पोह्यांमध्ये ते टाकावे. त्यावर मस्त लिंबु पिळून कांदा- बटाटा पोहे खावेत.

Paratha
  • जिरा पराठा

    गव्हाचं पिठ मळून पोळी लाटताना त्यात फक्त जिरं, मिठ आणि थोड तेल टाकावं. पोळी लाटून छान भाजावी. तुमचा जिरा पराठा रेडी असून तुम्ही चहासोबत याचा अस्वाद घेऊ शकता. जिरा पराठा खाल्ल्यामुळे सर्दी-खोकला, घशाची खवखव यापासून आराम मिळेल.

Cutlet
  • पालक कटलेट

    लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कटलेट खायला आवडते. त्यामुळे तुम्ही पालक कटलेट नाश्तासाठी बनवू शकता. पालकमध्ये भरपूर व्हिटामिन ए असते. तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होते.

Banana Bread
  • बनाना टोस्ट

    हा नाश्तासाठी बेस्ट पर्याय आहे. हे खायला खूप टेस्टी असते. लवकर बनवता येते.

Sprouts
  • स्प्राउट्स

    (मोड आलेली कडधान्य) हा नाश्तासाठी खायला बेस्ट पर्याय आहे. शरीरासाठी भरपूर पौष्टिक असणारा हा पदार्थ आहे. यातून शरीराला भरपूर ताकद मिळते.

French Bread
  • फ्रेंच टोस्ट

    अंड, साखर, लोणी यात बुडवून केलेले फ्रेंच टोस्ट खायला टेस्टी लागते. तसेच शरीरासाठी खूप लाभदायी ठरते. रोज नाश्ताला काही नवीन ट्राय करा. लवकर बनवता येईल आणि चविष्ट असेल असा पदार्थ तुम्ही बनवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT