Brownie Recipe  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Brownie Recipe : 2 मिनिटांत बेक करा स्वादिष्ट 'Chocolate Brownie'

जर तुम्ही ब्राउनी प्रेमी असाल तर ते आइस्क्रीमच्या स्कूपमध्ये मिसळा आणि आनंद घ्या.

दैनिक गोमन्तक

चॉकलेट ही सर्वच वयोगटातील माणसांना आवडणारी गोष्ट आहे. मग ही चॉकलेट ब्राउनी देखील आपल्या नक्कीच आवडणारी गोष्ट आहे. अगदी कमीतकमी वेळात तुम्हाला जर ब्राउनी करून पाहायची असेल तर तुम्ही फक्त 2 मिनिटांत बेक करू शकता. लोणी, मैदा, दूध आणि साखर यापासून चॉकलेट सहज बनवता येते. तुमच्या गोड खाण्याच्या इच्छेसाठी ही योग्य रेसिपी आहे.

मायक्रोवेव्ह ब्राउनी बनवायला खूप सोप्या आहेत आणि सर्व वयोगटातील लोकांना ते आवडतील. जर तुम्ही ब्राउनी प्रेमी असाल तर ते आइस्क्रीमच्या स्कूपमध्ये मिसळा आणि आनंद घ्या.

ब्राउनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • 4 चमचे बारीक केलेले डार्क चॉकलेट

  • 6 चमचे मैदा

  • दूध

  • 2 टेबलस्पून बटर

  • 4 चमचे साखर पावडर

  • चिमूटभर मीठ

ब्राउनी बनवण्याची कृती :

एका भांड्यात बारीक केलेले डार्क चॉकलेट ठेवा. आता बटर घालून 20 सेकंद मायक्रोवेव्ह करा. दोन्ही चांगले मिसळा. नंतर मैदा, साखर, मीठ एका वाडग्यात घ्या आणि एकत्र करा. दुधासह चॉकलेटचे मिश्रण घाला. गुळगुळीत पीठ बनवण्यासाठी चांगले फेटून घ्या. आता एका बेकिंग टिन किंवा काचेच्या डब्यात बटर पेपर लावा.

त्यात पीठ घाला आणि सारखे पसरवा. मिश्रण दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करा. बेक झाल्यावर त्याचे तुकडे करून त्यावर चॉकलेट सॉस पसरवा. ब्राउनी तयार आहे. त्यावर आईस्क्रीम टाकूनही तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलांना ही रेसिपी नक्कीच आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT