जरीची साडी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

जरीची साडी नेसताना विशेषत: घ्या ही काळजी.

भरजरी पैठणीलाही (Saree) ऐतिहासिक मान असून हे महावस्त्र ऐश्वर्याचे व वैभवाचे प्रतीक मानले जाते

दैनिक गोमन्तक

भारताच्या पारंपारिक (traditional) वस्त्रांमध्ये साडीला (Saree) महत्वाचे स्थान आहे, भारतात राज्य (State) बदलले की साडी परिधान पद्धत बदलेल पण, भारतात साडी आवर्जून परिधान केली जाते. साडी म्हणजे भारतीय स्त्रियांच्या (Women) मनाचा हळवा कोपरा. कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवी साडी खुणावतेच.

आता भारतभर इतक्या वेगवेगळ्या पोताच्या, शैलीतच्या आणि भरजरीने सजलेल्या साड्या असतात. साड्यांच्या या विविधतेमुळेच प्रत्येक स्त्रीला या साड्यांचे आकर्षण असते. प्रत्येक प्रांतात साडी नेसण्याची पध्दत, त्यावरचे डिसाईन, कलाकुसर वेगवेगळे आहे.उंच स्त्रीने मोठ्या बॉर्डरची तर बुटक्या स्त्रीने बारीक बॉर्डरची साडी नेसल्यास, त्यावर साजेशी पर्स किंवा हॅंडबॅग घेतल्यास व्यक्तीमत्व अधिक उठून दिसते. पूर्वी नऊवारी साडीची पद्धत होती. पण आता नऊवारी साडी ऐवजी तरुण मुली व स्त्रिया पाच-सहावारी साड्या परकरवर नेसू लागल्या. विवाहप्रसंगी नववधूला दिल्या जाणाऱ्या साड्यांना विशेष महत्त्व असून त्या बहुधा मौल्यवान, भरजरी, भपकेबाज व आकर्षक रंगसंगतीच्या असतात. बनारसी शालू नववधूला महावस्त्र म्हणून देण्याचीही प्रथा आहे. बनारसी शालूप्रमाणेच भरजरी पैठणीलाही ऐतिहासिक मान असून हे महावस्त्र ऐश्वर्याचे व वैभवाचे प्रतीक मानले जाते. परंतु जरीच्या साड्या नेसताना खूप काळजी घ्यावी लागते.

जरी साड्या नेसताना घ्यावयाची काळजी:

परंतु भरजरी साड्या नेसताना दोन प्रकारे काळजी घ्यावी लागते.

  • पहिली म्हणजे या साड्या पूर्ण रेशमी असतात त्यामुळे त्यावर पाणी किंवा अन्य कोणतीही गोष्ट सांडून देऊ नका. कारण रेशमा एकदा डाग पडला की तो निघत नाही.

  • दुसरी गोष्ट म्हणजे भरजरी साड्या नेसल्यावर कोणत्याही विद्युत प्रवाहित वायरीला किंवा प्रवाहित वस्तूला स्पर्श करू नका कारण आपण नेसलेल्या साडी मध्ये जी जरी असते ती चांदी पासून किंवा धातू पासून बनलेली असते. आणि धातू हा विद्युत प्रवाहाचा वाहकच आहे. यामुळे शॉक बसू शकतो. म्हणूनच भरजरी किंवा जरीच्या साड्या नेसताना ही काळजी नक्की घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT