Winter care Tips: हिवाळ्यात ओठांची घ्या अशी काळजी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter care Tips: हिवाळ्यात ओठांची घ्या अशी काळजी

हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.

दैनिक गोमन्तक

हिवाळा (Winter) सुरू होताच त्वचा (Skin) कोरडी पडू शकते. परंतु फाटलेल्या आणि कोरड्या ओठांची समस्या आधी जाणवते. अनेकांना इतका त्रास होतो की ओठातून रक्त येवू लागते. अशावेळी लिप बाम (Lip Balm) लावला तरी अजिबात मऊ होत नाहीत. चल तर मग जाणून घेवूया हिवाळ्यात ओठांची कशी काळजी घ्यावी.

* ओठांवरची मृत त्वचा काढून टाकावी

ओठांची काळजी घेण्यासाठी नियमितपणे त्यावरील मृत त्वचा काढून टाकणे आवश्यक असते. यासाठी दोन चमचे बेकिंग सोडा एक चमच पाण्यात मिक्स करावे. हे मिश्रण ओठांवर लवावे आणि हाताच्या बोटांचा वापर करून चोळावे. नंतर ओठ पाण्याने स्वच्छ धुवावे आणि टिश्यूने पुसावे. त्यानंतर ओठांवर ऑलिव्ह ऑईल लावावे. असे केल्याने ओठांची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.

या गोष्टी लक्षात ठेवाव्या

* अनेकांना ओठांना पुन्हा पुन्हा स्पर्श करण्याची सवय असते. असे केल्याने फाटलेल्या ओठांची समस्या वाढू शकते. त्यामुळे असे करू नका. याशिवाय ओठांवर वारंवार हात लावल्याने सूज आणि खाज सुटू शकते.

* अनेकजण ओठांवर जीभ फिरवतात, असे केल्याने ओठ अधिकच फुटू शकतात. जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती करणे बंद करा.

* हिवाळ्यात अनेक लोक पाणी पिणे कमी करतात. हे देखील ओठ फाटणे आणि कोरडे होण्याचे कारण असू शकते. ओठांच्या त्वचेवर पाण्याची आणि आर्द्रतेची कमतरता असते. त्यामुळे हिवाळ्यात पुरेसे पाणी प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT