Sweet Corn Paratha Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sweet Corn Paratha Recipe: हिवाळ्यात स्वीट कॉर्न पराठा चाखायला आवडेल का? मग आजच नोट करा रेसिपी

तुम्हाला हिवाळ्यात जीभेचे चोचले पुरवायचे असेल तर स्वीट कॉर्न पराठा नक्की ट्राय करू शकता.

Puja Bonkile

Sweet Corn Paratha Recipe: हिवाळ्यात पराठे खाण्याची मज्जाच वेगळी असते. पण तुम्ही एकाच प्रकारचे पराठे खाऊन बोरं झाले असाल तर जीभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वीट कार्न पराठा ट्राय करू शकता. स्वीट कॉर्न पराठा बनवणे खूप सोप असून आरोग्यदायी देखील आहे.

स्वीट कार्न पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ

स्वीट कॉर्न

उकडलेले बटाटे

कांदा- बारीक चिरलेला

हिरवी मिरची- बारीक चिरलेली

कोथिंबीर

हळद

तेल

मीठ - चवीनुसार

  • कृती

स्वीट कॉर्न पराठे घरी बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. यासाठी सर्वात पहिले स्वीट कॉर्न चांगले किसून घ्या आणि एका भांड्यात ठेवावे.

यानंतर किसलेल्या कॉर्नमध्ये उकडलेले बटाटे घालून चांगले मॅश करावे.

नंतर त्यात हळद, मीठ, कांदा, कोथिंबीर सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करावे.

सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर 10-15 मिनिटे सेट करण्यासाठी सोडावे.

एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन चांगले मळून घ्यावे.

नंतर पिठाचे छोटे गोळे करून त्यात बनवलेले मिश्रण भरावे. नंतर पराठे लाटून घ्यावे.

नंतर तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूंनी भाजूण घ्यावे.

यानंतर हिरव्या किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT