Goan Ghotache Sasav Recipe 
लाइफस्टाइल

Goan Ghotache Sasav Recipe: आंबट-गोड चवीचे गोवन घोटाचे सासव! रेसिपी एकदा करून बघाच...

कोकणी पाककृती समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. हे कोकणी लोकांच्या सांस्कृतिक आणि पाक परंपरांचे प्रतिबिंब आहे.

Kavya Powar

Goan Ghotache Sasav Recipe

कोकणी पाककृती समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. हे कोकणी लोकांच्या सांस्कृतिक आणि पाक परंपरांचे प्रतिबिंब आहे. जरी सीफूड हे कोकणी पाककृतीचे वैशिष्ट्य असले तरी गोव्यातले अनेक शाकाहारी पदार्थ देखील लोकप्रिय आहेत.

घोटाचे सासव (Goan Ghotache Sasav) ही एक गोड, आंबट आणि मसालेदार पिकलेल्या आंब्याची रेसिपी आहे.ही रेसिपी जास्तीत-जास्त 20 मिनिटांच्या आत तयार होते.

घोटाचे सासव हा पारंपरिक कोकणी पदार्थ आहे. उन्हाळ्यात, जेव्हा आंबे मुबलक प्रमाणात मिळतात, तेव्हा घोटाचे सासव ही रेसिपी गोव्यातल्या घराघरात केलीच जाते. चला तर मग पाहूयात याची स्टेप-बाय-स्टेप रेसिपी....

साहित्य

  • पिकलेले आंबे

  • किसलेले ओले खोबर

  • हळद पावडर

  • तिखट

  • तेल

  • हिंग

  • मोहरी

  • मेथी दाणे

  • मीठ

  • गूळ

  • पाणी

कृती

  • घोटाचे सासव करण्यासाठी सगळ्यात आधी पिकलेले आंबे स्वच्छ धुऊन घेऊन त्याची साले काढून घ्यावीत.

  • त्यानंतर ग्रेव्हीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले किसलेले खोबरे घालून त्याच्यामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर टाकून थोडेसे पाणी ओतावे आणि मिश्रण एकजीव वाटून घ्यावे.

  • कढईत दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकावेत.

  • नंतर त्याच्यामध्ये सोlललेले आंबे टाकावेत.

  • यानंतर वाटलेले खोबऱ्याचे मिश्रण त्याच्यामध्ये टाकावे व चवीपुरते मीठ वरून टाकावे.

  • शेवटी दोन चमचे गूळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकावे.

  • शेवटी एक उकळी येऊ द्यावी. अगदी 15-20 मिनिटात तयार आहे घोटाचे सासव.

घोटाचे सासव ही एक चविष्ट गोवन स्टाईल करी आहे. ही भातासोबत करी सर्व्ह करू शकता. ही रेसिपी आपल्यासोबत मधुरा वायंगणकर यांनी शेयर केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT