Swasthyam 2022 For Better Health | Global Swasthyam  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Swasthyam 2022 : निरोगी आरोग्यासाठी असे असावे डाएट

Swasthyam Event: आरोग्यासाठी आहाराचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

दैनिक गोमन्तक

‘डाएट’ म्हणजे कमी खाणं, तेल न खाणं हा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर होऊन निरोगी आरोग्यासाठी आहाराचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ‘वैमानिक’ म्हणून करिअरची सुरुवात झाली खरी; परंतु त्यात मन रमलंच नाही. ‘नागरिकांमध्ये आहाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी’, या उद्देशाने ‘डायटिशन’, ‘न्यूट्रिशन’ विषयाच्या अभ्यासास सुरुवात केली. आरोग्य चांगलं राहण्यासाठी कमी खाणं हा पर्याय नसून, योग्य आहार घेणं गरजेचं आहे. नागरिकांमध्ये ‘डाएट’ या शब्दाबाबत अनेक गैरसमज आहेत आणि त्यांचा हा गैरसमज दूर केल्यास खऱ्या अर्थाने समाधान मिळतं.

- नूपुर पाटील, आहारतज्ज्ञ (स्पोर्ट्स न्युट्रिशियनिस्ट)

मुळात मी पोषण आहारतज्ज्ञ आहे. त्यानंतर क्रीडा प्रकारांकडे वळाले. सुरवातीला धावणे, सायकलिंग आणि मग पोहणे सुरू केले. माझे वजन कमी झाल्यामुळे ऊर्जा मिळाली आणि त्यातून मी धावणे, सायकलिंग आणि पोहणे हे क्रिडा प्रकार करू शकते. ‘व्यायाम करते म्हणून ही सर्व करू शकते’, असे खूप जणांना वाटते. वास्तविक वजन कमी झाल्यामुळे व्यायाम करू लागले. बारावीनंतर वैमानिक होण्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. वयाच्या विशीत व्यावसायिक पायलट म्हणून करिअर सुरू केले. दोन-अडीच वर्ष पायलट म्हणून चार्टर्ड एअरलाइन्स या कंपनीत काम केले. दरम्यान जीवनशैलीवर खूप परिणाम झाल्याचे जाणवले.

त्यामुळे पुन्हा भारतात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बायो-टेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी शिक्षण घेतले. त्यानंतर पोषणतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ याविषयांशी संबंधित अभ्यासक्रमही पूर्ण केला. या क्षेत्राबद्दल उत्सुकता आणि आवड दिवसागणिक वाढत गेल्याने वेगवेगळे अभ्यासक्रम करत गेले. अजूनही मी स्वत:ला विद्यार्थी समजते. या क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. नवनवीन संशोधन आले की त्यानुसार आपल्या ज्ञानात भर पाडणे आणि आपल्या ज्ञानाचा इतरांसाठी उपयोग करणे, हे मला आवडते.

आहारतज्ज्ञ ते स्पोर्ट्स न्युट्रिशियनिस्ट

सुरुवातीला माणसाला सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी कोणता आहार आवश्यक आहे आणि आहार कशा पद्धतीने घेतला पाहिजे, यासंदर्भातील अभ्यास केला. त्यानंतर पोषण व आहारतज्ज्ञ क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर क्रिडा पोषण व आहारतज्ज्ञ (स्पोर्ट्स न्युट्रिशियनिस्ट) होण्याची संधी आली. खेळाडू असल्यामुळे ओघाने या क्षेत्रात रस निर्माण झाला. भारताच्या ऑलिपिंक समितीकडून ‘स्पोर्ट न्यूट्रिशन म्हणूनही प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे. त्याशिवाय केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानातही ॲम्बॅसिडर बनले.

अशा संधी येत गेल्या आणि त्याचा स्वीकार केला. राज्य स्तरावरील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यास पात्र आहेत. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंमध्ये आहाराबाबत जागृकता असते. आहार कसा असला पाहिजे, जास्तीत जास्त चांगले खेळण्यासाठी आहाराबाबत जागरूक असले पाहिजे, अशी भावना खेळाडूमध्ये दिसते. परंतु भारतात खेळाला फारसे महत्त्व दिले जात नाही, हेही वास्तव आहे. त्यामुळे बहुतांश खेळाडू आहाराबाबत पुरेसे जागृत नसल्याचे दुदैवाने दिसते. अन्य देशांमध्ये खेळाला विशेष महत्त्व दिले जाते.

आपल्या देशातही खूप चांगले खेळाडू आहेत. परंतु पुरेशा पायाभूत सुविधा, ज्ञानाचा अभाव, आहाराकडे दुर्लक्ष करणे यामुळे खेळाडूंच्या क्षमता अपुऱ्या पडतात. भारतीय आहार हा मुळातच कमी प्रमाणात प्रथिने असणारा आहे. म्हणूनच सोशल मीडिया आणि विविध माध्यमांद्वारे खेळाडू, नागरिक यांच्यापर्यंत योग्य माहिती पोचविण्याचा प्रयत्न करते.

‘फिट इंडिया’द्वारे तंदुरुस्तीचा सल्ला

केंद्र सरकारच्यामार्फत ‘फिट इंडिया’ ॲम्बेसिडर म्हणून २०१९-२०मध्ये निवड झाली. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व नागरिकांमध्ये तंदुरुस्त राहण्याबाबत जागरूकता करणे आणि दैनंदिन जीवनात खेळ आणि व्यायाम यांचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकाने स्वत:ला आरोग्यसंपन्न ठेवावे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. ॲम्बेसिडर झाल्यानंतर मोहिमेत आपल्याला दिलेल्या विषयावर व्हिडिओ बनविण्यास सांगण्यात येते. हे व्हिडिओ मोहिमेद्वारे नागरिकांपर्यंत पोचविले जातात. अनेक नागरिक या मोहिमेमुळे जागृत झाले आहेत.

मानसिक आजाराकडे पाहण्याची दृष्टी

समाजात शारीरिक आजारांकडे नागरिक आता पुरेशा डोळसपणे पाहत आहेत. परंतु मानसिक आरोग्याकडे ‘आजार’ म्हणून पाहण्याची दृष्टी अद्यापही तयार झाली नसल्याचे दिसते. मानसिक आजाराबाबत माहिती नसल्यामुळे तो एक आजार आहे, हेच मान्य केले जात नाही. किंबहुना आजार म्हणून मान्य केले तरीही मानसिक आजार, रोग आपण लपविण्याचा प्रयत्न करतो आणि हे अंत्यत चुकीचे आहे. मला २०१२ ते २०१४ दरम्यान नैराश्य आले होते.

त्यावेळी मानसिक आजारांकडे लोक त्याकडे कसे पाहतात, याची अनुभूती घेतली आहे. मानसिक आजाराबाबत लाजण्याचे किंवा लपविण्याचे काहीही कारण नाही. आपण शारीरिक आजारांकडे पाहतो, त्या दृष्टीने त्याकडेही पहावे. मनही आपल्या शरीराचाच एक भाग आहे. मानसिक आजार झाला असल्यास तो मान्य केला पाहिजे, त्याबाबत जागृत राहिले पाहिजे, तरच आपण आपली चांगल्याप्रकारे मदत करू शकणार आहोत. मानसिक आरोग्याबाबत देशात विविध पातळ्यांवर जागरूकता निर्माण केली जात आहे. तथापि याबाबत जागरूकता नसल्याचे चित्र भारतातच दिसते. पाश्चात्त्य, युरोपियन देशांचा मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही खूप वेगळा आहे, ते याकडे केवळ एक आजार म्हणून पाहतात.

आरोग्यसंपन्न‌ संतुलित जीवनशैली

माणसाच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहायचे झाल्यास, भारतीय संस्कृतीत आयुर्वेद आणि योगासने हे दोन मूळ घटक आहेत. अमेरिकेसह जगभरात सर्वत्र योगासनांकडे आजारांवरील एक औषध किंवा उपचार पद्धती म्हणून पाहिले जाते. म्हणूनच मूळ भारतीय असणारे आयुर्वेद आणि योगासने आपण जास्तीत जास्त उपयोगात आणणे गरजेचे आहे. आरोग्यसंपन्न होण्यासाठी योगासनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, निरोगी राहण्याबरोबरच मन:शांती आणि मानसिक आरोग्य संतुलित राहण्यासाठीही योगासने उपयुक्त ठरतात. आयुर्वेद आणि योगासने यांद्वारे आपण जगासमोर ‘आरोग्यसंपन्न आणि संतुलित जीवनशैली’चा नवा आदर्श निर्माण करत आहोत.

आयुर्वेद, योगासने, प्राणायाम या ज्ञानाचा जगभरात प्रसार करणे गरजेचे आहे. जगभरातील नागरिक नियमित औषधापेक्षा त्याला पर्यायी औषधांचा विचार करत आहेत. भारतात घराघरांत आयुर्वेदाबाबत माहिती आहे, घरोघरी त्यातील कित्येक उपायांचा वापर केला जातो. उदा. जखम झाल्यास त्यावर हळद लावण्याचा प्राथमिक उपचार केला जातो. आजकाल आजारी पडणाऱ्यांची संख्या, आजारांचे प्रकार यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये निरोगी राहण्याबाबत जागरूकता वाढत आहे. निरोगी आरोग्यासाठी योगासने, व्यायाम, फिटनेसचे महत्त्व नागरिकांना लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः नवी पिढी ‘फिटनेस’चा विचार करत असल्याचे जाणवते.

निरोगी आरोग्यासाठी आहार कसा असावा

‘सकाळ’तर्फे आयोजित ‘स्वास्थ्यम’ कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण विषयावर संवाद साधणार आहे. विषय आहे, ‘द रिअल मिनिंग ऑफ वर्ड डाएट’. कारण, ‘डाएट’ या शब्दांचा अर्थ खूप चुकीच्या पद्धतीने घेतला जातो किंवा वापरला जातो. हे केवळ भारतातच घडते असे नाही, तर संपूर्ण जगभरात या शब्दांचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला जातो. आपण म्हणतो की ‘मी आता डाएट करणार आहे’ त्यावेळी मनात सगळ्यात आधी कमी खाणे, सॅलेड खाणे, तूप न खाणे, साखर न खाणे, हे सगळे येते. हे पूर्णतः चुकीचे आहे. ‘डाएट’म्हणजे काय आपण जे रोज खातो आणि त्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो.

आता कोठेही तुम्ही जा. फास्टफूड, जंकफूडची दुकाने जास्त प्रमाणात असल्याचे आढळून येईल. याचाच अर्थ लोक हे ‘फूड’ खात असल्यामुळे ही दुकाने वाढली आहेत. नागरिकांच्या आरोग्यावर जंकफूड, फास्टफूडचा परिणाम होत असल्याचे दिसून येते, त्यातूनच आजाराच्या समस्या बळावत आहेत. ‘डाएट’ म्हणजे कमी खाणे, तेल, तूप न खाणे असे नाही. आरोग्य चांगले राहण्यासाठी ‘तूप’ हे खूप महत्त्वाचे आहे. किमान तीन चमचे तूप आवश्यकच आहे. वरण-भात खाणेही गरजेचे आहे.

नागरिकांमध्ये ‘डाएट’ हा शब्दाबाबत असणारा गैरसमज दूर करते, तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान मिळते. आजकाल ‘कार्बोहायड्रेट, फॅट असणारे पदार्थ खायचे नाहीत’ अशी एक नवीनच फॅशन आली आहे. परंतु हे खूप चुकीचे आहे. शरीरामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट जाणेही तितकेच आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी घरगुती जेवणच उत्तम, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आजवर मला आणि ग्राहकांना आलेल्या अनुभव आणि त्यातून निरोगी आरोग्यासाठी जीवनशैली, आहार कसा असावा, याबाबत ‘स्वास्थ्म’द्वारे मार्गदर्शन करणार आहे.

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT