Summer Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा चंदन, त्वचेच्या समस्या होतील दुर

उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही चंदन वापरु शकता.

दैनिक गोमन्तक

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात त्वचेवर पुरळ, लालसरपणा, पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते. प्रत्येकजण आपली त्वचा उन्हापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो.

त्वचेवर चंदन लावणे खुप फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात असलेले गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करतात, तसेच त्वचेला थंडावा देतात. चंदनामुळे त्वचा मऊ आणि ग्लोइंग तर होते. तसेच त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

  • मुरुमांपासून सुटका

चंदनाची पेस्ट चेहऱ्यावरील मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करते. एवढेच नाही तर मुरुमांमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सूजवरही चंदनाची पेस्ट प्रभावी आहे. 

  • त्वचेच्या नुकसानापासून बचाव करते 

कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा खराब होऊन काळी पडू लागते. काही वेळा मुरुम निघून जातात पण त्यांचे हट्टी डाग राहतात. अशा स्थितीत चंदनाचा चमत्कारिक प्रभाव दिसून येतो. यासाठी चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि थोडे दूध घालून पेस्ट बनवा. आता ते चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा.

  • हायड्रेटेड ठेवते

त्वचा हायड्रेटेड नसल्यामुळे ड्राय पडू लागते. चंदनामध्ये आढळणारे तेल त्वचेचा कोरडेपणा दूर करते. यासाठी चंदनाच्या पावडरमध्ये दोन चमचे गुलाबजल मिक्स करुन पेस्ट तयार करा.

  • टॅनिंग

उन्हाळ्यात (Summer) टॅनिंगची समस्या सामान्य आहे. अशावेळी चंदनाची पेस्ट लावणे फायदेशीर ठरते. कारण ते टॅनिंगला प्रतिबंध करते. चंदनामध्ये अँटी-टॅनिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला टॅनिंगपासून वाचवतात. यासाठी चंदन पावडर, मध, लिंबाचा रस आणि दही मिक्स करा. आता ही पेस्ट प्रभावित भागावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.

  • जिंगची लक्षणे कमी करते

चंदनामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, जे त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात .चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यासाठी चंदनाची पेस्ट फायदेशीर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT