Summer tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Tips: पंखा अन् कुलर सुद्धा देईल AC सारखी थंड हवा, कुलिंगसाठी ट्राय करा 'समर हॅक'

घरी एसी तरी नसला तरी घेउ शकता उन्हाळ्यात थंड हवा.

दैनिक गोमन्तक

Summer Tips: उन्हाळ्याच्या झळा सुरु झाल्या आहेत. यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जर तुम्हाला थंड हवा घ्यायची असेल तर या टिप्सचा वापर करु शकता.

तुमच्या घरातील पंखा किंवा कुलरसुद्धा या कडक उन्हापासून तुमचे संरक्षण करू शकत नसेल, तर तुम्ही घरच्या घरी एसी सारख्या हवेसाठी एक जुगाड बनवू शकता.

तुम्हीही या उन्हाळ्यात (Summer) घरी एसीसारखी हवा घेउ शकता. तुम्हाला घरी एसी लावण्याची गरज भसणार नाही. तुम्ही कमी खर्चामध्ये देखील उन्हाळ्याचा आनंद घेउ शकता. तसेच फॅन किंवा कुलरमध्ये एक छोटेसे मशीन बसवु शकता आणि फॅनला एसी बनवु शकता. फॅन आणि एसीचा स्पीड वाढवण्यासाठी DIY हॅक चा योग्य वापर करुन उन्हाळ्याच्या सुट्टींचा आनंद लुटण्यास मदत करु शकता.

जर तुमचा कूलर देखील कमी हवा देत असेल तर हे जाणून घ्या की खराब कंडेन्सरमुळे असे होऊ शकते. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही तुमच्या कूलरमध्ये बसवलेले कंडेन्सर बदलता, तेव्हा तुमचा कूलर आपोआप एसीप्रमाणे काम करू लागतो. 

तुम्ही घरच्या (Home) घरी कूलर किंवा फॅनचे कंडेन्सर सहजपणे बसवू किंवा ठीक करू शकता. तुम्हाला हे कंडेन्सर बाजारात फक्त 120 ते 500 रुपयांमध्ये मिळेल.

  • कुलरमध्ये धूळ जमा होऊ देऊ नका

कूलरच्या पंख्यामध्ये धूळ आणि घाण साचल्यामुळे गरम किंवा कमी हवा येऊ लागते. म्हणूनच पंखा आणि कंडेन्सर वेळोवेळी स्वच्छ करणे खूप प्रभावी ठरू शकते.

  • कुलर योग्य ठिकाणी ठेवा

कूलरमधून एसीसारखी हवा येण्यासाठी कूलर योग्य ठिकाणी ठेवणे खुप गरजेचे आहे. कूलर पाण्याच्या साहाय्याने थंड हवा बाहेर फेकून देतो, त्यामुळे जर कूलरचा वापर करून खोली खूप थंड होत असेल, तर ती खिडकीसमोर ठेवावी किंवा काही प्रकारचे वेंटिलेशन ठेवावे. यामुळे गरम हवा बाहेर पडू शकेल आणि थंड हवा तुमच्या रुमबोवती फिरू शकेल.

  • कूलरमध्ये बर्फ ठेवावे

जर तुम्हाला कूलरची खूप थंड हवा घ्यायची असेल तर पाण्यासोबत तुम्ही कूलरमध्ये बर्फाचे तुकडेही टाकू शकता. यामुळे कूलरची जाळी अधिक थंड होईल आणि तुम्ही जास्त काळ थंड हवेचा आनंद घेऊ शकाल.

  • पंख्याची गती वाढवा

तुम्ही पंख्याच्या ब्लेडचा पुढचा भाग ओल्या कापडाने स्वच्छ करून पंख्याचा वेग अधिक वाढवू शकता. आपल्याला ब्लेड खूप हळू आणि हलके स्वच्छ करावे लागेल, तरच सकारात्मक परिणाम होईल.

  • कूल डाउन फॅन मोटर

पंख्याची (Fan) मोटार जास्त वेळ चालल्याने गरम झाल्यावर पंखा गरम हवा देतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पंख्याला एसीसारखी थंड हवा द्यायची असेल, तर पंखा संतुलित पद्धतीने चालवा. म्हणजेच, गरज नसताना पंखा बंद करा, जेणेकरून मोटर पुन्हा थंड होईल आणि ती परत चालू केल्यावर तुम्हाला थंड हवा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT