Mango Sandwich  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Special Recipe: उन्हाळ्यात मुलांना मँगो सँडविच खायला द्या

आंब्याच्या कापांपासून तयार केलेले हे सँडविच केवळ स्वादिष्टच नाही तर शरीरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते.

दैनिक गोमन्तक

Mango Sandwich Recipe : उन्हाळ्याचे आगमन होताच बाजारपेठेत आंबे दिसू लागले आहेत. साध्या आंब्याबरोबरच घराघरांतही आंबे खाण्याची सुरूवात झाली आहे. साधा आंबा खायला जेवढा स्वाद लागतो, तितक्याच त्यापासून बनवलेल्या पाककृतीही स्वादिष्ट असतात. तुम्ही कधी मॅंगो सँडविच ट्राय केला आहे का ? आंब्याच्या कापांपासून तयार केलेले हे सँडविच केवळ स्वादिष्टच नाही तर शरीरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते. आत्तापर्यंत तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहिली नसेल, तर आम्ही तुम्हाला ती बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. मुलांनाही त्याची चव खूप आवडेल. ब्रेड स्लाइससोबत, आंब्याचे सँडविच बनवण्यासाठी आंब्याचे काप वापरले जातात. हे बनवायला खूप सोपे आहे आणि ते काही मिनिटांत तयार होते. हे नाश्त्यात किंवा दिवसा स्नॅक म्हणून देखील खाल्ले जाऊ शकते. (Mango Sandwich Recipe)

मँगो सँडविचसाठी लागणारे साहित्य

आंव्याचे स्लाइस

ब्रेड स्लाइस – 4

काळी मिर्च – 1 चिमुटभर

मिठ – चविनुसार

बटर – 1 टेबलस्पून

मँगो सँडविच बनवण्याची पद्धत

मँगो सँडविच बनवण्यासाठी आधी आंबा घ्या आणि तो धुवून त्याचे तुकडे करा. एका भांड्यात काढा आणि बाजूला ठेवा. आता ब्रेडचे तुकडे घेऊन सपाट जागी ठेवून त्याच्या सभोवतालच्या कडा चाकूच्या साहाय्याने कापून वेगळ्या करा. (तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते कापल्याशिवाय वापरू शकता.) आता ब्रेडचे तुकडे एका सपाट जागेवर ठेवून, चाकूच्या मदतीने, त्यांच्या भोवती हलकेच बटर लावा.

ब्रेडला बटर लावल्यावर त्यावर आंब्याचे काप टाका आणि वर काळी मिरी पुड शिंपडा. त्यानंतर चवीनुसार मीठ शिंपडा आणि वर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवून सँडविच बंद करा. यानंतर, सँडविच मध्यभागी किंवा तिरपे कापून प्लेटमध्ये ठेवा. आता तुमचा स्वादिष्ट मँगो सँडविच तयार आहे. सॉससोबत तुम्ही हे सॅडविच सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT