Summer Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Care Tips: उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना अधिक महत्व

उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे घालावे हे जाणून घेऊया

दैनिक गोमन्तक

मार्च महिन्याची सुरुवात होताच हवामानातही बदल दिसू लागला आहे. हिवाळा चांगलाच ओसरला असून कडक उन्हाळा सुरू झाला आहे. ऋतू बदलाबरोबर आपल्या खाण्यापिण्यात आणि इतर गोष्टीमध्ये बरेच बदल होतात. आपल्या घरातील कप्प्यात देखील बदल करण्याची गरज असते. हिवाळ्यात हलक्या कापडांना आणि हलक्या रंगांना अधिक महत्व असते. आता उन्हाळा सुरु झाला आहे. जाणून घेऊया उन्हाळ्यात (Summer) कोणत्या प्रकारचे कडपे घालावेत.

* लाइट रंगाचे कपडे घाला

उन्हाळ्यात, चमकदार रंग डोळ्यांना टोचतात, म्हणून लाइट रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे. याशिवाय पांढरा रंगही उन्हाळ्यासाठी योग्य आहे. अनेक लोक उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे पसंद करतात.

* घट्ट कपड्यांपासून अंतर ठेवा

हिवाळ्यात घट्ट कपडे जितके आराम देतात तितकेच ते उन्हाळ्यात त्रासदायक बनतात. ते परिधान केल्याने उष्णता आणि चिकटपणा वाढतो. असे कपडे निवडा जे परिधान केल्यावर तुम्ही कम्फर्टेबल असाल. याशिवाय स्लीव्हलेस, ऑफ- शोल्डर किंवा पफ-स्लीव्ह टॉप्स इत्यादी प्रकारचे कपडे परिधान करू शकता.

* डेनिम टाळा

तसे लोकांना प्रत्येक सीझनमध्ये डेनिम कपडे घालणे आवडते. पण उन्हाळ्यात डेनिम घालणे त्रासदायक ठरू शकते. डेनिम हे जड कपड्यांपैकी एक आहे. यामुळे स्किन टाईट जीन्समुळे अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याऐवजी हलकी सुती किंवा तागाची पँट घालावे. जीन्स घालायची असेल तर सैल आणि हलक्या फॅब्रिकची जीन्स घाला.

* वनपीस वापरून पहा

जर तुम्हाला स्वत:ला आधुनिक लुक द्यायचा असेल, तर उन्हाळ्यात तुम्ही मिडी आणि इतर वनपीस कपडे वापरून पाहू शकता. हे हलके फॅब्रिक कपडे तुम्हाला उन्हाळयात घातल्यास तुम्हाळ घामाचा त्रास होणार नाही.

* सिंथेटीक कपडे घालणे टाळा

सिथेंटीक कपडे उन्हाळ्यात प्रिक वाढवण्याचे काम करतात. त्यांना तुमच्या वॉर्डरोबमधून बाहेर ठेवा. त्याऐवजी कॉटन , सुती किंवा रेशमी प्रकारचे कपडे घालावे . उन्हाळ्यात असे कपडे घालण्यास अधिक प्राधान्य दिले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT