Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: हिवाळ्यात सांधेदुखीने त्रस्त आहात? ‘या’ उपायांनी मिळेल आराम

थंडीच्या महिन्याच्या सुरूवातीस, सांधेदुखी आणि स्नायू उबळ होण्याची प्रकरणे वाढतात, विशेषत: वृद्ध लोकांमध्ये ज्यांना तीव्र वेदना होतात.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉक्टर सांगतात की, जसजसा हिवाळा सुरू होतो तसतसे सांधेदुखी (Joint Pain) आणि स्नायू कडक होण्याचे प्रमाण वाढते. थंडीच्या महिन्याच्या सुरूवातीस, सांधेदुखी आणि स्नायू उबळ होण्याची प्रकरणे वाढतात, विशेषत: वृद्ध लोकांमध्ये ज्यांना तीव्र वेदना होतात. थकवा, धावपळ आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आता केवळ वृद्धांनाच नव्हे तर तरूण व्यक्तींनाही कमी वयातच सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे, झोपण्यापूर्वी उबदार शॉवर घेणे आणि स्वतःला हायड्रेट ठेवणे हे वेदना कमी करण्याचे काही मार्ग आहेत.

शरीरात आवश्यक असलेल्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, हाडे आणि सांधे यांचे कनेक्टिव्ह टिश्यूज (connective tissues) कमकुवत होऊ लागतात. यामुळे सांधेदुखीचा त्रास फार वाढतो. त्याच वेळी, थंडीच्या दिवसात हा त्रास आणखी वाढल्याने काही लोकांना तो सहन करणे अतिशय कठीण होते.

थंडीत हाडांची घनता (bone density) वाढवणारे, हाडं मजबूत करणारे आणि शरीरातील सूज कमी करणारे असे पदार्थ काळजीपूर्वक निवडावेत. आयुर्वेदातही असे अनेक उपाय आणि आहाराच्या टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे सांधेदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे सेवन केल्याने सांधेदुखीच्या वेदना सुसह्य होतील.

कॅल्शिअमयुक्त पदार्थ-

कॅल्शिअम हा आपल्या हाडांतील मुख्य घटक आहे, म्हणूनच जेव्हा शरीराला कॅल्शिअम पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तेव्हा हाडं कमकुवत होऊ लागतात आणि वेदना सुरू होतात. शरीरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस हा आजारही होऊ शकतो आणि अनेक समस्याही वाढू शकतात. अशा परिस्थितीत पुरेशा प्रमाणात कॅल्शिअमच्या मिळावे यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याव्यतिरिक्त, तीळ, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या, अंडी आणि सुका अंजीर यांचे सेवन करावे.

व्हिटॅमिन डी-

आपल्या शरीराद्वारे कॅल्शियमचे नीट शोषण व्हावे आणि त्याद्वारे हाडं आणि सर्व अवयवांचे पोषण व्हावे, यामध्ये व्हिटॅमिन डी हे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जर शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत नसेल तर या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो आणि आपली हाडं कमकुवत होऊ शकतात. त्याचप्रमाणे सांधेदुखीचे प्रमाणही खूप वाढते, अतिशय वेदना होऊ लागतात. व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळावे यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.

उबदार कपड्यांचा वापर करा-
सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी. आपले संपूर्ण शरीर उबदार कपड्यांनी उबदार ठेवल्याने सांधेदुखी कमी होईल. पायात मोजे घाला. थंडीत अशी खबरदारी घेतल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

भरपूर पाणी प्या-
हिवाळ्यात तहान कमी लागते, परंतु, आपल्या शरीराला नेहमीप्रमाणेच पाण्याची गरज असते. कोणत्याही ऋतूत शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे आपले शरीर अधिक सक्रिय राहते. तुम्ही पाण्याऐवजी ज्यूस, सूप किंवा इतर पेयांनी शरीर हायड्रेट ठेवू शकता.

(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT