Bad Food For Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bad Food For Health: आजच 'हे' पदार्थ खाणे करा बंद, अन्यथा रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते, तेव्हा ते आपल्याला अनेक प्रकारचे संक्रमण, विषाणू आणि परजीवीपासून संरक्षण करण्यास मदत करते.

Puja Bonkile

List of Bad Food For Health: निरोगी शरीरासाठी पोषक आहाराची गरज असते. बदलत्या वातावरणात अनेक आजार टाळण्यासाठी आणि जंतूंशी लढण्याची क्षमता असलेल्या अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तसेच, जेणेकरुन आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते, तेव्हा ते आपल्याला अनेक प्रकारचे संक्रमण, विषाणू आणि परजीवीपासून संरक्षण करण्यास मदत करते.

गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबुत असणे गरजेचे आहे. पण जर तुम्ही काही पदार्थ अति-प्रमाणात खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. जाणून घेऊया कोणते पदार्थ खाणे टाळावे.

  • प्रोसेस केलेले पदार्थ

सध्याच्या फास्ट लाइफमध्ये प्रोसेस केलेले पदार्थ अधिक खालले जातात. हे पदार्थ खायला तर चवदार असतात. पण आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. हे पदार्थ अनहेल्दी असतात.

प्रोसेस केलेल्या पदार्थांमध्ये सोडिअमचे प्रमाण अधिक असते. तसेच यामध्ये आर्टिफिशिअल प्रिजर्वेटिव्ह आणि अनहेल्दी फॅट असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

  • तेलकट पदार्थ

जर तुम्ही तेलकट पदार्थ खात असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. कारण असे पदार्थ खायला तर चवदार असतात पण आरोग्यासाठी हानिकारक असतात.

जर तुम्ही तेलकट पदार्थांचे अतिसेवन करत असाल तर पोटा संबंधित आजार उद्भवू शकतात.

  •  कॅफिनयुक्त पदार्थ

काही लोक कॅफीनयुक्त पदार्थांचे अतिसेवन करतात. यामुळे तुम्हाला निद्रानाश समस्येचा त्रास होऊ शकतो.

जास्त कॅफिन असलेले पदार्थ खाल्ल्याने झोप येते, पण पुरेशी झोप न घेतल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. म्हणूनच तुमच्या झोपेची वेळ एकच ठेवणे गरजेचे आहे.  

  • गोड पदार्थ

जर तुम्ही जास्त गोड पदार्थ खात असाल तर तसे करणे टाळावे. ज्या पदार्तांमध्ये साखर कमी आहे त्या पदार्तांचे सेवन करावे.

यामुळे पांढऱ्या रक्तपेशी कमकुवत झाल्यामुळे तुम्ही इतर आजारांना बळी पडू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT