Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health: स्ट्रेस आणि विचारांचं चक्र कस थांबवायचं?

Health: आपले विचार व आपलं मन सैरावैरा धावत सुटलं. गोंधळ, अतिविचार आणि त्यामुळं स्ट्रेस असे चक्र चालू होऊ लागतं.

दैनिक गोमन्तक

तुमच्याकडं पाळलेलं कुत्रं किंवा मांजर आहे का? ते पिल्लू असताना आणलं, त्याला खायला घातलं, वेळोवेळी औषधोपचार केले, प्रेम दिलं, गोंजारलं, त्याच्याबरोबर खेळलात, त्याचा सांभाळ केला आणि एक दिवस ते तुम्हालाच येऊन कचकन् चावलं तर कसं वाटेल? अरे, मी पाळलेलं मलाच नुकसान करत आहे! आपलं मन कधीकधी (बऱ्याचदा) असंच करतं. त्याच्याबरोबर आपण लहानाचे मोठे झालो, त्याला वेळोवेळी गोंजारलं, सांभाळलं, हवं नको ते दिलं, पण अनेक प्रसंगी ते आपलंच दुश्मन बनतं.

Health विचारचक्र आणि स्ट्रेस

गेल्या वर्षभरात अनेक जणांकडून गांगरलेल्या, गोंधळलेल्या आवाजात, ‘पुन्हा लॉकडाउन होणार आहे का?’, ‘असं म्हणतात बाबा’, ‘तुम्हाला काही माहिती आहे का?’, ‘खरंच लॉकडाउन होणार आहे का?’ असे ढीगभर प्रश्न एकमेकांना आणि मलाही विचारताना ऐकलं. जी गोष्ट अजून घडलेलीच नाही, नियमावली जाहीर झाली नाही, खात्रीशीर बातमी अजून बाहेर आली नाही त्याच्या आत आपले विचार व आपलं मन सैरावैरा धावत सुटलं. गोंधळ, अतिविचार आणि त्यामुळं स्ट्रेस असे चक्र चालू होऊ लागतं. अनावश्यक विचारांनी उगीचंच डोक्यातली जागा अडून बसते. म्हणजे बाहेर गोष्टी घडायच्या आत आपल्या मनात निर्माण होऊन, मोठ्या होऊन, उच्छाद मांडू लागतात. याची काहीच गरज नसते खरंतर. लॉकडाउन झाला तर जे करायला लागणार आहे, ते तुम्ही करणारच आहात. प्रत्यक्ष घटना घडायच्या आधी त्याची रंगीत तालीम मनात सुरू होते. अशा प्रकारे विचारांची भुणभुण हरप्रसंगी होत गेली, तर हळूहळू मन अशा पॅटर्नच्या आहारी जायला लागते. आता हे विचारांचं चक्र थांबवायचं कसं, याबद्दल आपण पुढील लेखात जाणून घेऊयात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT