Solar Eclipse 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Solar Eclipse 2023: नवरात्रीपुर्वी होणार सूर्यग्रहण, जाणून घ्या ग्रहणाशी संबंधित धार्मिक नियम

वर्षातील शेवटचे सुर्यग्रहण असून नवरात्रीच्या एखदिवस आधी होणार आहे. यामुळे ग्रहणाशी संबंधित धार्मिक नियम पाळणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

यंदा नवरात्री 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान माता दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. पण या वर्षी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील नवरात्री सुरू होण्याच्या एक दिवस आधी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हे सूर्यग्रहण अश्विन महिन्यातील अमावास्येला होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात सूर्यग्रहण नसल्यामुळे त्याचा सुतक वेळ वैध राहणार नाही. भारतीय वेळेनुसार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता संपेल. वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण अमेरिका आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसणार आहे.

ग्रहणाच्या धार्मिक श्रद्धा

ग्रहणाबाबत अनेक प्रकारचे समज आहेत. धार्मिक मान्यतेनुसार ज्या ठिकाणी सूर्यग्रहण दिसते, तेथे ग्रहण सुरू होण्याच्या ठीक 12 तास आधी सुतक सुरू होतो. सुतक काळ शुभ मानला जात नाही. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. 14 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. या कारणास्तव सुतक कालावधी भारतात वैध राहणार नाही.

सुतक काळात पूजा करणे टाळावे

धार्मिक दृष्टिकोनातून सुतक काळ शुभ मानला जात नाही. ग्रहण लागल्यापासून पहिला सुतक कालावधी सुरू होतो. या काळात पूजा, नवीन कार्याचा शुभारंभ, हवन, मुंडन, विवाह यांसारखे शुभ कार्य केले जात नाहीत. सुतक कालावधी सुरू झाल्यावर मंदिरांचे पडदे आणि दरवाजे बंद केले जातात. सुतक काळात मंत्रांचा सतत जप करावा लागतो.

ग्रहणाशी संबंधित धार्मिक मान्यता

हिंदू मान्यतेनुसार सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीला असते तर पौर्णिमा तिथीला चंद्रग्रहण असते.

ग्रहणाची मान्यता राहूशी संबंधित मानली जाते. ज्यामध्ये पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत राहतात आणि चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. यामुळे सूर्याचा आंशिक किंवा पूर्ण प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही आणि या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहणानंतर चंद्रग्रहणही होणार

14 ऑक्टोबरला सुर्य ग्रहण झाल्यानंतर चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरच्या पौर्णिमेला होणार आहे. हे चंद्रग्रहण आंशिक चंद्रग्रहण असेल. जे भारतात पाहायला मिळते. भारतीय वेळेनुसार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 01:06 ते 02:22 पर्यंत चंद्रग्रहण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT