Smoking Bird Viral Video  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Smoking Bird Viral Video : काय सांगता, चक्क पक्षी स्मोकिंग करतो? विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा

Smoking Bird Viral Video : व्हिडिओ पाहून असे दिसते की, जणू पक्षी 'स्मोकिंग' करत आहे.

दैनिक गोमन्तक

अनेकदा अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात, ज्या पाहिल्यानंतरही विश्वास ठेवणे कठीण जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज येत असतात, मात्र काहीवेळा काही आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो.हे नुकतेच व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल, ज्यामध्ये एक सुंदर लहान पक्षी 'स्मोकिंग' करताना दिसत आहे. तो तोंडातून धूर बाहेर पाडताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते की, जणू पक्षी 'स्मोकिंग' करत आहे.

(Smoking Bird Viral Video )

इंटरनेटवरचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. जगात अनेक प्रकारचे पक्षी राहत असले तरी कधी-कधी निसर्ग आपल्या आत दडलेले निसर्गाचे असे सुंदर पक्षी समोर आणतो, जे पाहून कधी कधी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारा हा अनोखा पक्षी तोंडातून धूर काढताना दिसत आहे.

हा व्हिडिओ चेन्नईचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) अनंत रूपनगुडी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एक अतिशय सुंदर लहान पक्षी दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की एक फोटोग्राफर एका अनोख्या पक्ष्याचा क्लोज अप शॉट घेत आहे. व्हिडिओमध्ये पांढरी पिसे असलेला हा पक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पक्ष्याच्या डोळ्यांपासून ते मानेपर्यंतचा भाग वेगळ्या रंगाचा असून त्याच्या सौंदर्यात भर घालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ इथे पाहा :

तोंडातून 'स्मोक' निघत असल्याने या पक्ष्याला स्मोकिंग बर्ड असे नाव देण्यात आले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'Popularly called the smoking bird - such a beauty! Wonder what it's actually called!' हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 276.9K व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी 10.3 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT