Skydiving Tips:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skydiving Tips: पहिल्यांदाच Skydiving करताय? मग या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

जर तुम्हीही पहिल्यांदाच स्कायडायव्हिंग करण्याचा विचार करत असाल तर काही महत्वाची गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

अनेक लोकांना फिरायला नवनव्या ठिकाणांना भेट द्यायला आवडते. असे बरेच लोक आहेत ज्यांना प्रवासाची तसेच अॅडव्हेचर अॅक्टिव्हिटी करण्याची खूप आवड असते. यामध्ये स्कायडायव्हिंग, ट्रेकिंग,बंजी जम्पिंग याचा समावेश होतो. पण तुम्ही पहिल्यांदाच स्कायडायव्हिंग करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

उंचीची भीती नसावी

अनेकदा असे दिसून येते की अनेकांना उंचीची भीती वाटते, परंतु मुद्दामहून उंचीवरून उडी मारण्याचे प्लॅनिंग सुरू करतात. उंचावरून उडी मारताना, अस्वस्थतेमुळे आपण चूक करतो आणि ती चूक घातक ठरते.

जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर तुम्ही स्कायडायव्हिंग करू नका. जर तुम्ही अजूनही स्कायडायव्हिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सर्वात पहिले तुमच्या मनातील भीती घालवा. यासाठी तुम्ही प्रशिक्षणही घेऊ शकता.

गाईडसोबत स्कायडाव्हिंग करावे

तुम्ही पहिल्यांदाच स्कायडायव्हिंग करण्याचा विचार करत असाल तर गाईडला घेऊनच स्कायडायव्हिंग करावे. जर तुम्ही पहिल्यांदाच गाईडशिवाय स्कायडायव्हिंगला गेलात तर अस्वस्थतेतून तुम्ही अनेक चुका करू शकता.

जर स्कायडायव्हिंग गाईडसोबत केले तर तुम्ही सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकता. पहिल्यांदाच आलेला गाईड तुमच्यासोबत स्कायडायव्हिंग करत असेल तर तुमची हिंमत कायम राहते.

फिटनेस चेक करावे

स्कायडायव्हिंग करण्यापूर्वी डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला आधीच पीबी किंवा शुगर इत्यादी कोणतेही आजार असेल तर स्कायडायव्हिंग करण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा.

ज्या लोकांना हृदयविकार आहे अशा लोकांनी स्कायडायव्हिंगचा विचारही करू नये, कारण त्यांना अधिक त्रास होऊ शकतो.

प्रॉपर ट्रेनिंग घ्यावे

पॅराग्लायडिंग आणि स्कायडायव्हिंग हे काही अॅडव्हेचर अॅक्टिव्हिटी आहेत. जे करण्यापूर्वी प्रॉपर ट्रेनिंग करणे आवश्यक आहे. स्कायडायव्हिंग करताना थोडासा निष्काळजीपणाही तुमचा जीव घेऊ शकतो.

भारतात आणि परदेशात जिथे जिथे स्कायडायव्हिंग होते तिथे पर्यटकांना प्रॉपर ट्रेनिंग दिले जाते. स्कायडायव्हिंग करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, हे अनेक ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर दाखवले जाते.

या टिप्स ठेवा लक्षात

सर्टिफिकेट स्कायडायव्हिंग संस्थेसोबतच स्कायडायव्हिंगचा प्लॅन करावा.

स्कायडायव्हिंगला करण्यापूर्वी गाईडची नीट माहिती घ्या.

अनेक ठिकाणी स्कायडायव्हिंगपूर्वी मेडिकल अॅग्रीमेंट ही केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT