Skin Care Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: हिवाळ्यात चेहरा निस्तेज झालाय? मग ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

तुम्हाला तुमच्या निस्तेज त्वचेवर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.कारण पुढील घरगुती उपाय चहऱ्यावर चमक आणण्यास मदत करेल.

Puja Bonkile

Skin Care Tips: वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर आणि मानेवर सुरकुत्या दिसू लागतात. यामुळे हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. याचे कारण म्हणजे बदलती लाइफस्टाइल, प्रदूषण आणि हवामान, त्यांचा परिणाम चेहऱ्यावर सर्वाधिक दिसून येतो. अशावेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

कितीही महागडे प्रोडक्ट वापरले तरी कोणताही फायदा होत नाही तर पैसे खर्च होतात. त्यामुळे हे उपाय बाजूला ठेवून पुढील काही उपाय ट्राय करू शकता. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसेल. 

  • टोमॅटो आणि नारळाचे दूध


जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असेल तर तुम्ही यासाठी टोमॅटो आणि नारळाचे दूध वापरू शकता. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे. 

  • कसा कराल वापर


यासाठी सर्वात पहिले टोमॅटोचे बारीक तुकडे करावेत.

त्यानंतर एका भांड्यात नारळाचे दूध घ्यावे.

नंतर हे टोमॅटोचे तुकडे दुधात बुडवावे.

नंतर 15 मिनिटे झाकून ठेवावे.

यानंतर ते चेहऱ्यावर लावून चांगले चोळावे.

सुमारे 15-20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावे.

यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.

त्यानंतर चेहऱ्यावर बर्फ लावा. 

यामुळे तुमची त्वचा टाइट होते. 

मसाजचे फायदे कोणते

  • टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा एकसारखा दिसतो.

  • नारळाचे दूध त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यासही मदत होते. त्यामुळे तुम्ही ते नक्कीच वापरावे.

  • टोमॅटो आणि नारळाच्या दुधात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही त्यांचा एकत्र वापर करू शकता. ते त्वचेचे संरक्षण करते आणि त्वचा घट्ट होण्यास देखील मदत करते.

  • तुम्ही हे अँटी-एजिंग स्किनसाठी देखील वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT