आपली त्वचा उजळ आणि स्वच्छ दिसण्यासाठी टोनरचा वापर करावा. Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips : पावसाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी करा 'हे' चार उपाय

त्वचा फ्रेश ( Fresh) दिसण्यासाठी क्लीन्जरचा (Cleanser) वापर करावा.

दैनिक गोमन्तक

Skin Care Tips : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. तीव्र उन्हानंतर पडणार पाऊस (Rain) हा सर्वांना हवाहवासा वाटतो. आपण घरी बसून मस्त पावसाचा आनंद घेत असतो. तरीसुद्धा त्वचेची आणि केसांची (Hair) काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदलामुळे आपली त्वचा (Skin) कोरडी (Dry) तसेच निर्जीव होते. यामुळे पावसाळ्यात त्वचेसह (Skin) केसांची काळजी घेण्यासाठी प्रभावी स्कीनकेअर वापरणे गरजेचे आहे.

स्कीन स्वच्छ ठेवणे -

पावसाळ्यात त्वचा तेलकट (Oily) आणि कोरडी (Dry) पडते. यामुळे नियमित त्वचा स्वच्छ ठेवावी. आपली त्वचा फ्रेश ( Fresh) दिसण्यासाठी क्लीन्जरचा (Cleanser) वापर करावा. संवेदनशील त्वचेसहच वेगवेगळ्या त्वचेसाठी योग्य असे क्लीन्जर (Cleanser) वापरावे. तसेच पॅकेजिंगच्या मागे दिलेली माहिती नक्की वाचावी.

टोनरचा वापर करावा -

आपली त्वचा उजळ आणि स्वच्छ दिसण्यासाठी टोनरचा वापर करावा. त्वचेला फ्रेश करणार टोनर वापरावा. नेहमी असा टोनर वापरा ज्याने त्वचा कोरडी पडणार नाही.फक्त 4 आठवड्यातच आपली त्वचा चमकदार दिसेल.

त्वचा मॉइश्चराईझ ठेवणे -

उन्हात किंवा पावसाळ्याच्या दिवसात त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉइश्चराईझचा वापर करावा. म्हणूनच spf15 असलेल्या मॉइश्चराईझ वापरावा. हे 24 तास हायड्रेशन प्रदान करतात. तसेच त्वचेवरील गडद दाग कमी करण्यास मदत करते. यामुळे त्वचेचे सूर्यापासून बचाव देखील होतो.

त्वचेमध्ये ओलावा ठेवावा -

हायलोरोनिक अॅसिड आणि नियासिनामाइड-आधारीत प्रॉडक्ट त्वचेवरील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि टवटवीत ठेवण्यास उपयुक्त आहेत. म्हणूनच झोपताना नाइट क्रीम लावावे. यामुळे त्वचेतील ओलवा कायम टिकून राहण्यास मदत मिळते. हे दोन घटक त्वचेतील ओलवा टिकून ठेवण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT