Coffee is good for pimples and dark circles  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: पिंपल्स आणि डार्क सर्कलसाठी गुणकारी आहे कॉफी

कॉफीमध्ये (Coffee) नैसर्गिकरित्या ब्लीचिंग एजेट (Bleaching) असतात.

दैनिक गोमन्तक

Benefits of Coffee: तुमच्या चेहऱ्यांवर डाग आणि डोळ्याखाली डार्क सर्कल (Dark Circle) असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कॉफीमध्ये (Coffee) अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. विशेषबाब म्हणजे कॉफी डार्क सर्कल्सपासून ते पिंपल्सपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्या (Skin Problems) दूर करण्यात मदत करते.

तज्ञांच्या मते, तुम्ही कॉफी (Coffee) आपल्या स्कीनकेअरच्या नित्यक्रमात कॉफीचा समावेश करू शकता. कॉफी फेस पॅकचा वापर केल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले होतात. तसेच अनेक समस्यापासून सुटका मिळू शकते. कॉफी त्वचेसाठी (skin)कशी फायदेशीर आहे आणि ती कशी वापरली जाऊ शकते. जाणून घेऊया

* डार्क सर्कल

कॉफीमध्ये नैसर्गिकरित्या ब्लीचिंग एजेट (bleaching agent in Coffee) असतात. तुम्ही एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा मध आणि व्हिटॅमिन ई तेलाचे काही थेंब मिक्स करावे. हे मिश्रण काळजीपूर्वक आपल्या डोळ्याखाली लावावे. हे मिश्रण 15 मिनिटे ठेवावे. नंतर स्वच्छ धुवावे.

* सेल्युलाईट कमी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन रक्ताभिसारण सुधारून सेल्युलाईट कमी करण्यास मदत करते. एका बाउलमध्ये 1/4 कप कॉफी आणि 3 चमचे कोरफड जेल मिक्स करा. आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर स्क्रब लावा. तसेच 10 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करावी. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावे. या स्क्रबद्वारे चांगली मसाज केल्यामुळे पेशी उत्तेजित होतात. तसेच त्वचेला निरोगी बनवते आणि ग्लोइंग (Natural Glow) होते.

* एटी एजिंग

कॉफीच्या फेस पॅकमुळे तीव्र सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसणापासून बचाव करते. यासाठी एका बाउलमध्ये कॉफी पावडर, कोको पावडर मिक्स करावे. नंतर त्यात थोडे दूध मिक्स करून फेसपॅक तयार करावा. या मिश्रणात 2 थेंब मध आणि लिंबाचा रस घालावा. आता हे पॅक चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवावे. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

* पिंपल्सवर गुणकारी

कॉफीच्या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कारण कॉफीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणाचा समावेश असतो. यासाठी एका बाउलमध्ये 3 चमचे कॉफी पावडर आणि 2 चमचे ब्राऊन शुगर मिक्स करावे. त्यात 3 चमचे नारळ पाणी घालावे. याचे मिश्रण चांगले मिक्स करा. या फेस पॅकने चेहऱ्यावर चांगले मसाज करा. 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT