Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: हेवी मेकअपमुळे त्वचा होऊ शकते खराब, वेळीच घ्या काळजी

दिवाळीच्या पार्टीत तुम्ही जास्त मेकअप करू नका. कराण हेवी मेकअपमुळे त्वचा खराब होऊ शकते.

Puja Bonkile

Skin Care Tips: हिंदु धर्मात दिवाळी हा सणाला खुप महत्व आहे. तसेच हा सण प्रत्येकासाठी खुप खास आहे. आज सर्वांकडे दिवाळीची मोठ्या उत्साहात सुरू आहे. रंगीबेरंगी लाइटिंग, फुले आणि रांगोळी यामुळे संपूर्ण घर एकदम नवीन दिसते. तसेच महिला या दिवशी सुंदर कपडे घालून माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. महिला या दिवशी चेहऱ्यावर सामान्य दिवसांपेक्षा जास्त मेकअप करतात. पण काही वेळा हेवी मेकअपमुळे त्वचेला इजा होऊ लागते. मेकअप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

त्वचेचे प्रोटेक्शन करावे

सर्वात पहिले चेहरा पाण्याने स्वच्छ करावा. त्यानंतर फेस वॉश किंवा चांगल्या क्लिंजरचा वापर करावा. यामुळे त्वचेचे छिद्र बंद होतील आणि घाण निघून जाईल. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे. यामुळे त्वचेला ओलावा मिळेल. त्यानंतर हलका मेकअप करा आणि हेवी मेकअप करणे टाळावा.

जास्त कॉस्मेटिक्स वापरू नका

मेकअप करताना जास्त कॉस्मेटिक्स वापरू नका. जास्त कॉस्मेटिक्स वापरून मेकअप केल्याने नॅचरली लूक मिळत नाही आणि त्यामुळे त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात. ज्यामुळे मुरुम आणि पुरळ उठतात आणि चेहरा खराब दिसतो.

मेकअप रिमुव्ह करावा

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमुव्ह कराणे खूप गरजेचे आहे. असे न केल्यास मेकअप प्रोडक्ट आणि केमिकल्स त्वचेमध्ये शोषली जातात. यामुळे त्वचेवर मुरुम, पुरळ आणि लालसरपणा सारख्या समस्या उद्भवू शकतात. मेकअप रिमूव्हर आणि क्लिन्जरच्या मदतीने मेकअप पूर्णपणे काढून टाकावा. यानंतर, कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने चेहरा धुवावा. चांगले मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मॉइश्चरायझ राहते.

सनस्क्रीन लावावे

जर तुम्ही दिवसा मेकअप करत असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. जरी तुमच्या फाउंडेशनमध्ये SPF असेल तरीही वेगळे सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे आहे. हे तुमच्या त्वचेला सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांपासून बचाव होईल. चांगला सनस्क्रीन तुमचा मेकअप जास्त काळ टिकून ठेवण्यास देखील मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT