Aloe Vera For Dark Circles  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Aloe Vera For Dark Circles : कोरफडीच्या मदतीने दूर करा हट्टी डार्क सर्कल्स; वापरा 'या' 3 पद्धती

Aloe Vera For Dark Circles : डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या तुमच्या सौंदर्यावर खोलवर परिणाम करू शकते.

दैनिक गोमन्तक

Aloe Vera For Dark Circles : डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या तुमच्या सौंदर्यावर खोलवर परिणाम करू शकते. त्यामुळे ते कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. डार्क सर्कलची समस्या बहुतेकदा अशा लोकांना उद्भवते जे निद्रानाश, तणाव, खराब आहार यासारख्या समस्यांशी झुंज देत असतात. अनेक लोक डार्क सर्कल कमी करण्यासाठी विविध प्रकारचे ब्युटी ट्रीटमेंट घेतात, पण याचा तुमच्या डार्क सर्कलवर फारसा परिणाम होत नाही.

(Skin care tips Aloe Vera For Dark Circles)

जर तुम्हाला डार्क सर्कल कमी करायचे असतील तर तुम्ही यासाठी काही प्रभावी उपाय करू शकता. डार्क सर्कल कमी करण्यासाठी कोरफड खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही ती अनेक प्रकारे वापरू शकता.

कोरफडीच्या सहाय्याने डार्क सर्कल कसे कमी करायचे?

लिंबू आणि कोरफड वापरून डार्क सर्कल दूर करा

डार्क सर्कल दूर करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि लिंबू वापरू शकता. हे तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल. ते वापरण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे एलोवेरा जेल घ्या. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. आता ते डोळ्याभोवती सुमारे 15 मिनिटे लावा. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होईल.

Aloe Vera For Dark Circles

बटाटा आणि कोरफडीने डार्ट सर्कल काढून टाका

कोरफड आणि बटाट्याची पेस्ट तुमच्यासाठी डार्क सर्कल दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. ते वापरण्यासाठी, बटाट्याचा रस 1 चमचे घ्या. त्यात सुमारे 1 चमचे कोरफड जेल मिसळा. यानंतर हे मिश्रण डोळ्याभोवती लावा. साधारण 15 मिनिटांनी डोळे नीट धुवा. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होऊ शकते.

कोरफड आणि गुलाब पाणी

डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी गुलाबपाणी आणि कोरफड जेलचा वापर करा. ते वापरण्यासाठी 1 चमचे गुलाबजल घ्या. त्यात सुमारे 1 चमचे कोरफड जेल मिसळा. त्यानंतर डोळ्यांना लावा. 15 ते 20 मिनिटांनी डोळे चांगले धुवा. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT