Winter Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Skin Care Tips: अरे बाप रे!! हिवाळ्यात आपण नकळत करतोय त्वचेला त्रास होणाऱ्या चुका

Winter Care Simple Hacks: आम्ही तुम्हाला या दिवसांत कोणत्या गोष्टी करू नये हे अधोरेखित करून देणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण अनेकदा अशा काही चुका करतो जेणेकरून त्वचा खराब होऊ शकते.

Akshata Chhatre

Winter Skin Care Tips in Marathi

हिवाळ्याचा महिना सुरु झाला आहे. गार हवा आणि गार वातावरण याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होताना तुम्हला दिसत असेल. हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेची कशी काळजी घ्यावी हे तुम्हाला अनेकजणं सांगत असतील, तुम्ही ते उपाय करत देखील असाल मात्र आज आम्ही तुम्हाला या दिवसांत कोणत्या गोष्टी करू नये हे अधोरेखित करून देणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण अनेकदा अशा काही चुका करतो जेणेकरून त्वचा खराब होऊ शकते. चला मग जाणून घेऊया हिवाळ्यात आपण नेमक्या कोणत्या चुका करतोय...

गरम पाण्याने अंघोळ करू नका:

थंडीच्या दिवसांत गरम पाण्याची अंघोळ करू नका असं म्हटलं तर तुम्हाला ते पटणार नाही. पण तुम्हाला माहितेय का अशा थंड दिवसांमध्ये गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा आणखीन कोरडी होऊ शकते आणि म्हणूनच अंघोळीच्यावेळी अधिक गरम पाण्याने अंघोळ करणं टाळा.

याबदल्यात तुम्ही कोमट पाण्याची अंघोळ करू शकता, मात्र अंघोळीनंतर मॉइश्‍चराइजर लावायला विसरू नका.

मुलतानी मातीचा वापर टाळा:

खरंतर मुलतानी माती त्वचेसाठी बहुउपयोगी मानली जाते, मात्र थंडीच्या दिवसांत मुलतानी मातीचा वापर टाळावा, कारण मुलतानी मातीमुळे शरीर आणखीन कोरडं पडण्याची शक्यात असते. मुलतानी माती शरीरातील तेल खेचून घेते आणि यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. मात्र तुम्हाला मुलतानी मातीचा वापर करायचा असेल तर त्यात मध किंवा कोरफड घालायला विसरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT