Gym Exercise Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gym Exercise: होय! अति व्यायाम करणंही शरीरासाठी ठरू शकतं घातक; कसं ते घ्या जाणून

दररोज अति व्यायाम केल्यानेही अनेक समस्या उद्भवू शकतात.

दैनिक गोमन्तक

व्यायाम केल्याने आरोग्य उत्तम राहते. त्याचा फायदा एकूण आरोग्याला होतो. असे केल्याने सर्व प्रकारच्या आजारांचा धोकाही कमी होतो. अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने खुलासा केला की तिला हृदयविकाराचा झटका आला होता परंतु तिला शारीरिकरित्या सक्रिय राहण्याचा फायदा मिळाला आणि तिचा जीव वाचू शकला.

यानंतर तिच्यावर उपचार करणारे हृदयरोगतज्ज्ञांनी एका मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या, ज्यामध्ये त्यांनी जास्त व्यायाम न करण्याचा सल्लाही दिला होता. ते म्हणाले होते, दररोज अति व्यायाम केल्यानेही अनेक समस्या उद्भवू शकतात. चला जाणून घेऊयायाचे तोटे

जास्त व्यायाम धोकादायक

सुष्मिता सेनचे प्राण फिटनेस फ्रीक असल्यामुळे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय असल्यामुळे वाचले. ती नेहमीच योग्य पद्धतीने व्यायाम करत असते, त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका कमी झाला.

तिचे हृदयरोगतज्ज्ञ म्हणाले की, असे लोक जे सक्रिय शारीरिक जीवन जगतात, त्यांचे आरोग्य इतर लोकांपेक्षा अधिक फायदेशीर असते. त्यांचे हृदय मजबूत असते आणि त्यांचे आरोग्य देखील चांगले असते.

जर तुम्ही योग्य व्यायाम केला तर तुम्ही शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकता. मात्र व्यायामशाळेत जाणे आणि जास्त व्यायाम करणे देखील हानिकारक असू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही व्यायाम कराल तेव्हा सावधगिरीने करा.

एका आठवड्यात किती व्यायाम करावा?

हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, व्यायाम रोज करू नये. जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल तर आठवड्यातून फक्त 3 ते 4 दिवस व्यायाम करा.

जेव्हा तुम्ही व्यायाम कराल तेव्हा शरीराला व्यायामाच्या ताणातून सावरण्यासाठी वेळ द्या. कारण शरीराला सावरायला पुरेसा वेळ मिळाला नाही तर व्यायाम करून काही उपयोग होणार नाही. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल आणि तुम्ही विश्रांती घेत नसाल तर सतत व्यायाम केल्याने हार्मोनची पातळी बिघडू शकते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही धोक्यात येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT