Shrawan Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shrawan Special: जर तुम्हाला श्रावणात हिरवी साडी नेसायची असेल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये भगवान शिवाची मनोभावे पूजा केली जाते.

Puja Bonkile

Shrawan Special: प्रत्येकजण श्रावण महिन्याची वाट पाहत असतो. या महिन्यात सर्वत्र हिरवळ असते. संततधार पावसामुळे वातावरण निसर्गरम्य असते. विशेषत: श्रावणात मंदिरांमध्ये भगवान शिवाची पूजा केली जाते. 

या श्रावणात विवाहित स्त्रिया त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी महादेवाची मनोभावे पुजा करतात, तर अविवाहित मुली चांगल्या वरासाठी भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी पुजा करतात. अशावेळी महिलांना चांगले कपडे घालण्याची संधी मिळते. 

हिंदू धर्मात पूजेच्या वेळी स्वच्छ आणि कोरे कपडे घालण्यावर जास्त भर आहे. श्रावणात महादेवाची पूजा करण्यासाठी जाताना तुम्ही हिरवे कपडे घालू शकता. या पोशाखात साडी किंवा सूट सर्वोत्तम आहे.

  • योग्य दागिन्यांची निवड करा

    जर तुम्ही श्रावणात हिरवी साडी नेसणार असाल तर त्यासोबत दागिने नक्कीच घाला. त्यासोबत सोन्याचे दागिने अधिक सुंदर दिसतील. 

  • योग्य ब्लाउज आणि पेटीकोट निवडा

    साडी खरेदी करणे सोपे आहे, परंतु त्याच्यासोबत योग्य ब्लाउज आणि पेटीकोट असणे खूप कठीण आहे. अशावेळी लक्षात ठेवा की तुमचा ब्लाउज असा असावा की, जर तुम्हाला पूजेसाठी तासन्तास बसावे लागले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि पेटीकोटचा रंग साडीशी तंतोतंत जुळला पाहिजे. 

  • मेकअपची काळजी घ्या

    हिरवा रंग स्वतःच खूप तेजस्वी आहे. अशावेळी जास्त मेकअप न करण्याचा प्रयत्न करा. हलका मेकअप करूनही तुम्ही सुंदर दिसू शकता. 

  • योग्य हेअरस्टाईल निवडा

    पावसाळ्यात कधी पाऊस पडेल हे कळत नाही. अशावेळी आपली हेअरस्टाईल सिंपल बनवण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला हवे असल्यास केसांना फुलांचा गजरा लावूनही तुम्ही त्यांना मोकळे सोडू शकता. 

  • हिरव्या बांगड्या घालाव्यात

    हिरवी साडीसह हिरव्या बांगड्या घातल्यास तुमचा लूक पुर्ण होतो.

श्रावणात 7 गोष्टींचे दान केल्यास भोलेनाथांची होईल कृपा

रुद्राक्ष

सनातन धर्मात रुद्राक्ष हा महादेवाचा महाप्रसाद मानला जातो. श्रावण महिन्यात रुद्राक्ष दान केल्याने मोक्ष प्राप्त होतो तसेच पापकर्मातून मुक्ती मिळते.

चांदीची पिंड

शास्त्रानुसार श्रावणमध्ये चांदीचे दान केल्याने काल सर्प दोषापासून आराम मिळतो. चांदीच्या वस्तू दान केल्याने यशाचा मार्ग खुला होतो.

काळे तिळ

शनि आणि राहू-केतूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी श्रावण महिन्यात काळ्या तिळाचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने या ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढतो.

वस्त्र

श्रावणात गरीब किंवा गरजूंना कपडे दान केल्याने अक्षय पुण्य मिळते. वस्त्र दान केल्याने मान-सन्मान वाढतो असे मानले जाते. अशा लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa River Survey: नद्यांचा प्रवाह, पाण्याचा वेगही मोजणार; जल आयोग करणार पाहणी, शुक्रवारपासून सर्वेक्षणाला सुरवात

Vishkumbh Yog 2026: बॉसची नाराजी आणि कटू शब्द ऐकावे लागणार! 3 राशींची वाढणार चिंता; अवकाशात बनतोय 'विष्कुंभ योग'

खरी कुजबुज: मंदिराच्या विकासावर राजकारण?

Viral Post: "पेड लीव्ह आमचा हक्क, उपकार नाही!" कॉर्पोरेट कंपन्यांच्या 'टॉक्सिक' कल्चरवर भडकली तरुणी Watch Video

US Green Card: 3 लाख भारतीयांसाठी 'गुड न्यूज', अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय; 'एच-1बी' व्हिसाधारकांचा ग्रीन कार्डचा मार्ग अखेर मोकळा

SCROLL FOR NEXT