beard care Shravan Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Haircut in Shravan: श्रावण पाळणार आहात? केस-दाढी कापायची नाही; मग केसांची काळजी कशी घ्याल?

Shravan Month Hair Care: या महिन्यात केस कापणे किंवा दाढी करणे यालाही मनाई आहे. यामागे एक सखोल धार्मिक आणि वैज्ञानिक कारण दडलेले आहे

Akshata Chhatre

No Shaving Tips Shravan: हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे. हा महिना भगवान शंकराच्या पूजेसाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करण्यासाठी समर्पित असतो. काही लोकं यावेळी अनेक गोष्टी टाळतात, आणि काही गोष्टींचं विशेष पालन करतात. यांपैकीच एक म्हणजे केस न कापणं. श्रावण महिन्यात केस का कापू नयेत हे आज जाणून घेऊया.

श्रावण महिन्यात दारू, मांसाहारी पदार्थ, पालेभाज्या, कांदा आणि लसूण खाण्यास भक्तांना मनाई असते. याचप्रमाणे, या महिन्यात केस कापणे किंवा दाढी करणे यालाही मनाई आहे. यामागे एक सखोल धार्मिक आणि वैज्ञानिक कारण दडलेले आहे, जे शतकानुशतके पाळले जाते.

श्रावण महिन्यात केस कापणे का निषिद्ध मानले जाते?

श्रावण महिन्यात केस न कापण्यामागे एक खोल धार्मिक कारण आहे, जे पिढ्यानपिढ्या पाळले जात आहे. यामागे एक पौराणिक श्रद्धा आहे की, शतकांपूर्वी जेव्हा पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षित साधने आणि कौशल्य यांचा अभाव होता, तेव्हा केस कापताना दुखापत होण्याची शक्यता जास्त होती. श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते.

अशा परिस्थितीत, जर जखम झाली, तर ती लवकर बरी होण्याची शक्यता कमी असे. या कारणास्तव श्रावण महिन्यात केस कापले जात नसत. याच कारणामुळे दाढी न करण्याचीही परंपरा सुरू झाली. यावर्षीचा श्रावण महिना ५९ दिवसांचा असून, तो दोन महिन्यांपर्यंत चालेल. त्यामुळे या श्रावण महिन्यात आठ सोमवार येतील.

श्रावण महिन्यात केसांची काळजी कशी घ्यावी?

श्रावण महिन्यात धार्मिक आणि व्यावहारिक कारणांमुळे केस कापणे निषिद्ध असले, तरी केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही श्रावण महिन्यात केस कापले नाहीत, तर तुम्हाला केस दुभंगणे किंवा केस गळणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, येथे आम्ही तुम्हाला तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स देत आहोत:

  • पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ धुवा आणि त्यांना हवेने सुकवायला विसरू नका.

  • पावसाळ्यात अंघोळीला जाण्यापूर्वी १५ मिनिटे आधी केसांना खोबरेल तेल लावा.

या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही श्रावण महिन्यातही तुमच्या केसांची योग्य काळजी घेऊ शकता आणि धार्मिक नियमांचे पालन करत भगवान शंकराचे आशीर्वाद मिळवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT