Vastu Tips For Shravan Month: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Shravan Month: श्रावण महिन्यासाठी खास वास्तू टिप्स; 'या' 6 गोष्टी केल्यास भोलेनाथ होतील प्रसन्न

श्रावण महिन्यात भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास टिप्स सांगितल्या आहेत.

Puja Bonkile

Vastu Tips For Shravan Month: आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. आज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी असते. या महिन्यात भोलेनाथाची मनोभावे पुजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात.

भोलेनाथाला आवडणाऱ्या गोष्टीं अर्पण कराव्या. यामुळे भोलेनाथ देखील प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा दृष्टी कायम ठेवतात. पण वास्तुशास्त्रात देखील काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे भोलेनाथ तुम्चायवर प्रसन्न होतील.

अर्धनारिश्वराची मुर्ती
  • पुर्व दिशा अर्धनारिश्वराची मुर्ती ठेवावी

श्रावण महिन्यात पुर्व दिशेला खुप महत्व आङे. यामुळे ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी.तसेच वास्तुनुसार या दिशेला संगमरवरापासून बनवलेली अर्धनरेश्वराची मुर्ती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-शांती नांदते.

Tulsi
  • तुळशीचे रोप

श्रावण महिन्यात घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे लहान रोप लावावे. वास्तुनुसार अविवाहित महिलांनी भविष्यात चांगला नवरा मिळावा यासाठी हा उपाय करू शकतात.

Rudraksha
  • रुद्राक्ष

भगवान शंकराला रुद्राक्ष प्रिय आहे. जो भगवान शिवाच्या अश्रूंनी बनलेला मणी आहे. वास्तुनुसार श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे अनेक समस्या दूर होतात.

lord shiva

भगवान शंकराची पुजा करावी

वास्तुनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पुजा करावी. भगवान शंकराला बेलाचे फुल, फळ आणि पान अर्पण करावे. जीवनात शांती आणि समृद्धी हवी असेल तर श्रावण सोमवारी शिवलिंगावर दूध, दही आणि मध टाकून अभिषेक करावा.

धतुरा
  • धतुरा फुल

वास्तुनुसार भोलेनाथाला धतुरा फुल आणि फळ अर्पण करावे. हे दोन्ही भगवान शंकराला प्रिय आहे. अनेक मंदिरांमध्ये देखील या फुलांनी सजावट केलेली असते. यामुळे मनातील भीती दूर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT