Shravan Month Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shravan Special 2023: श्रावणात 7 गोष्टींचे दान केल्यास भोलेनाथांची होईल कृपा

श्रावणात 7 गोष्टींचे दान केल्याने संपूर्ण महिनाभर केलेल्या पूजेचे फळ मिळते असे मानले जाते.

दैनिक गोमन्तक
रुद्राक्ष
  • रुद्राक्ष

सनातन धर्मात रुद्राक्ष हा महादेवाचा महाप्रसाद मानला जातो. श्रावण महिन्यात रुद्राक्ष दान केल्याने मोक्ष प्राप्त होतो तसेच पापकर्मातून मुक्ती मिळते.

चांदीची पिंड
  • चांदीची पिंड

शास्त्रानुसार श्रावणमध्ये चांदीचे दान केल्याने काल सर्प दोषापासून आराम मिळतो. चांदीच्या वस्तू दान केल्याने यशाचा मार्ग खुला होतो.

काळे तिळ
  • काळे तिळ

    शनि आणि राहू-केतूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी श्रावण महिन्यात काळ्या तिळाचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने या ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढतो.

वस्त्र
  • वस्त्र

श्रावणात गरीब किंवा गरजूंना कपडे दान केल्याने अक्षय पुण्य मिळते. वस्त्र दान केल्याने मान-सन्मान वाढतो असे मानले जाते. अशा लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा असते.

तांदूळ
  • तांदूळ

अक्षत म्हणजे शिवपूजेत तांदळाला खूप महत्त्व आहे. श्रावणमध्ये दान केल्याने अन्नपूर्णे देवीची कृपा सदैव राहते. श्रावण सोमवारी भगवान शंकराला तांदळाची खीर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.

तूप
  • तूप

तूप शिवाच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. श्रावणामध्ये तूप दान केल्याने गंभीर आजारांपासून आराम मिळतो. तुपाची धारा बनवून शिवाला अभिषेक केल्याने आरोग्य लवकर सुधारू लागते.

मीठ
  • मीठ

शास्त्रामध्ये मीठ हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे. श्रावणामध्ये गरजूंना मीठ दान केल्याने सुख-समृद्धी वाढते. जीवनातील सर्व संकटातून मुक्ती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT