Remedies For Bad Shoes Smell Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shoes Cleaning Tips : तुमच्या शूजनाही उग्र वास येतो का? या सोप्या उपायांनी करा सुटका

Remedies For Bad Shoes Smell : पायाला घाम आल्यावर अनेकांच्या पायाला आणि चपलांना वास येऊ लागतो

दैनिक गोमन्तक

Shoes Cleaning Tips : पायाला घाम आल्यावर अनेकांच्या पायाला आणि चपलांना वास येऊ लागतो, ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, यामुळे अनेकवेळा लोकांना पेच सहन करावा लागतो. तुमच्यासोबतही असे होत असेल आणि तुमच्या शूजना वास येत असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही चपलांचा वास दूर करू शकता. (Remedies For Bad Shoes Smell)

  • पाय आणि शूजना दुर्गंधी का येते?

जास्त वेळ शूज घातल्यामुळे पायाला घाम येतो आणि त्यामुळे शूज आणि सॉक्समध्ये सतत ओलावा राहतो. जास्त वेळ ओलावा राहिल्याने पाय, मोजे आणि शूजमध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे दुर्गंधी येऊ लागते.

  • घाम शोषणारे मोजे घाला

शूज आणि पायांना वास येण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे घाम येणे आणि ते कमी करण्यासाठी घाम शोषणारे मोजे घालणे हा उत्तम पर्याय आहे. यामुळे घाम तर येईलच, पण शूजला वास येणार नाही. घाम शोषणारे मोजे बाजारात सहज उपलब्ध आहेत.

Remedies For Bad Shoes Smell
  • धुण्यायोग्य इनसोल्स वापरा

शूज दर आठवड्याला धुणे शक्य नाही, त्यामुळे शूजमध्ये धुता येण्याजोगे इनसोल्स वापरा. धुण्यायोग्य इनसोल्स 4-5 वेळा घातल्यानंतर धुवा. यामुळे शूजच्या वासापासून बऱ्याच अंशी सुटका होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT