Shiny Hair Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shiny Hair: चमकदार केसांसाठी फॉलो करा 'या' घरगुती गोष्टी

तुम्हालाही जर चमकदार केस हवे असतील तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Shiny Hair: सर्वांना वाटते की आपले केस हे घनदाट आणि चमकदार असावे. यासाठी अनेक केमिकल प्रोडक्ट आणि महागड्या गोष्टींचा वापर केला जातो. पण याचा काही परिणाम दिसत नाही. केस चांगले दिसण्याएवजी जास्त खराब होतात. तुम्हाला जर केसांची चमक वाढवायची असेल तर तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता.

केस डल का होतात?

केसांना स्टाईल देण्यासाठी स्टाइलिंग टूल्स वापरली जातात. स्टाइलिंग टूल्समध्ये कृत्रिम उष्णता असते. या उष्णतेमुळे केस खराब होतात तसेच ते डल होतात. त्यामुळे केसांची स्टाइल नैसर्गिक पद्धतीने करावी. 

हेअर केअर प्रोडक्टमध्ये खुप केमिकल असतात. केमिकलमुळे केसांचा रंग फिका पडतो. त्यामुळे नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने बनवलेल्या केसांच्या प्रोडक्टचा वापर करावा. 

जास्त सूर्यप्रकाशामुळेही केस डल होतात. म्हणूनच बाहेर जाताना स्कार्फच्या मदतीने केस झाकून ठेवावेत. जास्त वेळ उन्हात राहू नका. 

क्लोरीनयुक्त पाण्याने केस धुतल्यानेही केसांची चमक कमी होते. 

आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसांवर परिणाम होतो. चुकीच्या आहारामुळे केस गळतात आणि डल दिसतात.

कंडिशनर वापरून केस चमकदार होऊ शकतात का?

केसांना कंडिशन करणे महत्वाचे आहे. कोरडे आणि कुरळे केस चमकदार दिसत नाहीत. त्यामुळे शॅम्पूनंतर केसांना कंडिशनर लावावे. कंडिशनर केसांच्या बाहेरील थराच्या क्यूटिकलला मऊ करण्याचे काम करते. त्याच वेळी, हे केसांच्या आतील थर कॉर्टेक्सचे संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे केस धुतल्यानंतर कंडिशनरचा अवश्य वापर करावा. 

अ‍ॅव्होकॅडो हेअर मास्क

अ‍ॅव्होकॅडोमध्ये आवश्यक पोषक घटक आढळतात. जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच अ‍ॅवोकॅडोला सुपरफूड म्हटले जाते. जर तुमचे केस डल झाले असतील तर तुम्ही चमकदार केसांसाठी अ‍ॅवोकॅडो मास्क बनवू शकतात. मास्क बनवण्यासाठी पुढील गोष्टी फॉलो करा.

1लहान पिकलेला अ‍ॅवोकॅडो घ्या. 

आता अ‍ॅवोकॅडोची पेस्ट तयार करावी. 

त्यात 2-3 चमचे दही आणि 1 अंडी

सर्वकाही चांगले मिक्स करावे. 

चमकदार केसांसाठी हेअर मास्क तयार आहे . 

केसांची लांबी आणि मुळांवर हा मास्क लावावा. 

1 तासानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवावे. 

आठवड्यातून दोनदा हा हेअर मास्क वापरल्याने तुमचे केस चमकदार होतील. 

  • तेल लावल्याने केस चमकदार होतात का?

केसांना तेल लावल्यास चमकदार होतात. विशेषत: केसांना खोबरेल तेल लावल्याने ते चमकदार होऊ लागतात. आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने केसांच्या मुळात मसाज करावी. केसांना तेल लावल्याने केस मॉइश्चरायझ मिळते आणि निरोगी राहतात. 

  • या गोष्टी लक्षात ठेवा

दररोज केस धुणे टाळावे. केस जास्त धुतल्याने ते डल होतात. त्यामुळे तुमच्या प्रकारानुसार केस धुवावे. आठवड्यातून दोनदा केस धुणे चांगले असते. 

केसांवर रासायनिक उपचार करू नका. त्यामुळे केसांचा रंग हलका होऊ लागतो. केस डल होण्यासोबतच केसही खराब होऊ लागतात. नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने तुम्ही केसांना रंगही देऊ शकता. याशिवाय केस सरळ करण्यासाठी नारळाचे दूध आणि मध फायदेशीर आहे. 

केसांमध्ये हेअर सीरम आणि तेल अवश्य वापरावे. या दोन्ही गोष्टी केसांची चमक वाढवण्यासाठी मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kunkeri Hudo Utsav: होळीची अनोखी परंपरा! जिथे भक्तच देवावर मारतात दगड; सावंतवाडीतील कुणकेरीच्या 'हुडोत्सवा'चा अंगावर काटा आणणारा थरार

Micro Stress: ऑफिसचं काम अन् घराच्या जबाबदाऱ्या... 'मल्टीटास्किंग'मुळे वाढतोय 'मायक्रो स्ट्रेस' धोका; तणावाकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Bhoot Bangla: हातात रुद्राक्ष, डोळ्यांना गॉगल! अक्षयच्या 'भूतबंगला' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज; फॅन्स म्हणाले "अक्षय इज बॅक"

LSG New Logo: लखनऊ सुपर जायंट्सचा 'नवा अवतार'! आयपीएल 2026 पूर्वी लोगोमध्ये मोठा बदल; पाहा PHOTO

'83 वर्षे वय, पण स्वॅग तोच'! कल्की 2 चे शूटिंग सुरु; महानायक अमिताभ बच्चननी शेअर केला कमल हसनसोबत खास Photo

SCROLL FOR NEXT