Daily योग: शशांकासन Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily योग: शशांकासनाने स्मरणशक्तीत वाढ होते

शशांकासन हे आसन अत्यंत फायदेशीर आसन आहे.

दैनिक गोमन्तक

Daily Yoga: सध्याच्या काळात प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करत आहे. त्यामुळे एकाच जागी बराच वेळ बसून काम केल्यामुळे अनेक जणांमध्ये पाठदुखी, मानदुखी वा कंबरदुखीची समस्या निर्माण होत आहे. म्हणूनच या समस्येपासून सुटका करण्यासाठी शशांकासन हे आसन अत्यंत फायदेशीर ठरतं. (Shashankasana eliminates the problem of back pain)

कसं करावं शशांकासन?

प्रथम वज्रासनात बसावे. त्यानंतर दोन्ही हात वर करावेत आणि शरीराचा वरील भाग अलगदपणे जमिनीच्या दिशेने खाली आणण्याचा प्रयत्न करावा. यावेळी शक्य होत असल्यास डोकं जमिनीला टेकवावं आणि हातांचादेखील जमिनीला स्पर्श करावा. यावेळी पाठीला जितका स्ट्रेच देता येईल तितका स्ट्रेच द्यावा. या स्थितीत डोळे बंद करावे व काही सेकंद या स्थितीत राहावे. ३-४ मिनीटे या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू पुन्हा पहिल्या स्थितीत यावे.

https://www.instagram.com/p/CROMFWjAWQi/?utm_source=ig_web_copy_linkशशांकासनाचे फायदे -

१. पाठदुखीची समस्या दूर होते.

२. पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत मिळते.

३. पोटाशी निगडीत समस्या दूर होतात.

४. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

५. बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्या दूर होतात.

६. पाठीच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच मिळतो

७. या आसनाने स्मरणशक्ती देखील वाढते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT