Sharad Purnima 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sharad Purnima 2023: आज शारद पौर्णिमा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' उपाय

शरद पौर्णिमेला धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात आर्थिक समस्या येणार नाही.

Puja Bonkile

Sharad Purnima 2023: अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. यंदा शरद पौर्णिमा आज म्हणजेच 28 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. जर तुम्हाला पैशासंबंधित समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करू शकता. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शरद पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत आणि उपाय जाणून घेऊया.

माता लक्ष्मीची अशी पूजा करा

पंचांगानुसार, यंदा शरद पौर्णिमा तिथी 28 ऑक्टोबर 2023 रोजी येईल. पौर्णिमा दर महिन्याला येत असली तरी शुक्ल पक्षातील पंधरा तारखेला येणाऱ्या शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूसोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. हे अत्यंत शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणे देखील शुभ मानले जाते. शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. याला कोजागरी पौर्णिमा आणि रास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी काही उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. 

चंद्रोदयाची वेळ

यंदा शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार आहे. हे वर्षातील शेवटचे ग्रहण आहे. यासोबतच शनिवारी संध्याकाळी 5.20 वाजता चंद्राचा उदय होईल. चंद्र सकाळी 04:17 वाजता शिखरावर येईल आणि 29 ऑक्टोबरच्या रात्री 01:53 वाजता पौर्णिमा संपेल.

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा पुढील उपाय

  • शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची तसेच धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी विधीनुसार पूजा आणि व्रत करावे. असे मानले जाते की जर तुम्हाला पैशाची कमतरता किंवा कर्जाचा त्रास होत असेल तर या दिवशी व्रत ठेवावे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावर राहील. तसेच पैशासंबंधित समस्या उद्भवणार नाही.

  • शरद पौर्णिमेला माता लक्ष्मी मंदिरात सुपारीची पाने आणि सुपारी अर्पण करून लक्ष्मीला प्रसन्न करून आशीर्वाद मिळवु शकता. यामुळे आईचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील. 

  • शरद पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्राचा जप करावा. विधीपुर्वक स्थापन केल्यानंतर, श्री सूक्त किंवा माता लक्ष्मीजीच्या स्तोत्राचे पठण करा. या उपायांनी माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT