Science Dainik Gomantak
लाइफस्टाइल

विज्ञान परिषदेची विज्ञान चित्रपट कार्यशाळा

सातव्या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या विज्ञान चित्रपट कार्यशाळेचा समारोप गुरुवारी झाला.

दैनिक गोमन्तक

सातव्या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या विज्ञान चित्रपट कार्यशाळेचा समारोप गुरुवारी झाला. विविध महाविद्यालयांतील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. ता. 12 ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा छायाचित्रकार, चित्रपट निर्माता आणि विज्ञानप्रेमी राकेश राव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वैज्ञानिक संकल्पना मांडणारे आणि देशातील लोकांमध्ये विज्ञान संस्कृती रुजवणारे चित्रपट देशात बनवणे अत्यंत गरजेचे आहे ही बाब या कार्यशाळेत विशेषरित्या नमूद करण्यात आली.

कार्यशाळेच्या (workshop) पहिल्या दिवशी चित्रपट निर्माते राकेश राव यांनी चित्रपटासाठी विषय निवडणे, संशोधन करणे, स्रोत मिळवणे आणि वस्तुस्थिती तपासणी कशी करायची याबाबत तर दुसऱ्या दिवशी कॅमेरा तंत्र आणि तिसऱ्या दिवशी पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेविषयी माहिती दिली. अंटार्क्टिका आणि आर्क्टिक मोहिमांबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळेदरम्यान एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

राकेश राव म्हणाले, "वैज्ञानिक संकल्पना जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी छायाचित्रे आणि चित्रपट हे प्रभावी साधन ठरू शकतात. आज विज्ञान चित्रपट निर्मिती क्षेत्रात खूप कमी लोक काम करत आहेत. विज्ञान (Science) चित्रपट निर्मिती क्षेत्राबद्दल माहिती देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांची आवड निर्माण करणे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती".

या कार्यशाळेत सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी (Student) महोत्सवापूर्वी एक लघु विज्ञान चित्रपट सादर करेल, ज्याचे मूल्यांकन ज्युरींद्वारे केले जाईल. विजेत्या चित्रपटांना महोत्सवादरम्यान पुरस्कार आणि पारितोषिक म्हणून रोख रक्कम दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT