Rose Shrikhand  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

वेगळ्या चवीचे घरीच बनवा रोझ श्रीखंड, नोट करा रेसिपी

गणेशोत्सवादरम्यान तुम्ही बाप्पाला रोझ श्रीखंडही अर्पण करू शकता.

दैनिक गोमन्तक

Rose Shrikhand Recipe: श्रीखंड अनेक लोकांचा आवडता गोड पदार्थ आहे. कोणत्याही उत्सवादरम्यान घराघरात श्रीखंड बनवले जाते. श्रीखंड अनेक प्रकारे बनवता येते. आज आम्ही तुम्हाला रोझ श्रीखंड कसे बनवायचे हे सांगणार आहोत. गणेशोत्सवादरम्यान तुम्ही बाप्पाला अर्पण करण्यासाठी रोझ श्रीखंडही बनवू शकता. रोझ श्रीखंड अतिशय चविष्ट असून शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासही मदत करते. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. रोझ श्रीखंड बनवण्यासाठी तुम्ही मार्केटमधुन तयार चक्का विकत आणू शकता किंवा घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया रोझ श्रीखंड कसे बनवावे.

रोझ श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

घट्ट दही - 1 किलो

साखर - चवीनुसार

विलायची पावडर - 1 टीस्पून

रोझ सिरप - 2 टीस्पून

कृती

रोझ श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात पहिले दही घेऊन सुती कापडात बांधून उंच ठिकाणी ५-६ तास ठेवावे. यामुळे दह्यात असलेले पाणी सहज बाहेर पडेल. ठरलेल्या वेळेनंतर दही खाली उतरवावे,नंतर ते उघडा आणि उरलेले दही काढून एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा. यानंतर, हे दही हाताने किंवा मिक्सरच्या मदतीने सुमारे 10-15 मिनिटे चांगले फेटून घ्या.

लक्षात ठेवा की दह्यामध्ये असलेल्या गुठळ्या पूर्णपणे कमी होईपर्यंत दही चांगले मिक्स करावे. यानंतर चवीनुसार साखर घालून परत एकदा चांगले मिक्स करावे. यानंतर श्रीखंडात रोज सिरप घालून मिक्स करा. शेवटी विलायची पूड घालावी आणि श्रीखंड आणखी 7-8 मिनिटे फेटून घ्यावे. यानंतर फ्रिजमध्ये 3-4 तास थंड करण्यासाठी ठेवावे. रोझ श्रीखंड तयार आहे. तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT