Reuse Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Reuse Tips: मोहरीच्या तेलाच्या रिकाम्या बाटलीचा सजावटीसाठी 'असा' करा वापर

अनेक लोक मोहरीच्या तेलाच्या रिकाम्या बाटल्या फेकून देतात. पण रिकाम्या बाटलीचा अनेक कामांसाठी वापर करू शकता.

Puja Bonkile

Reuse Tips: अनेकदा लोक तेलाच्या रिकाम्या बाटल्यांना निरुपयोगी समजतात आणि फेकून देतात. असे करणे चुकीचे आहे. रिकाम्या बाटलीने तुम्ही अनेक घरगुती कामे करू शकता.  यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागणार नाही आणि तुमच्या घरची कामेही होतील. मोहरीच्या तेलाच्या रिकाम्या बाटलीचा कसा वापर करू शकता हे जाणून घेऊया.

  • मोहरीच्या बाटलीचा वापर कसा कराल

रिकाम्या मोहरीच्या तेलाच्या बाटलीचा पुन्हा वापर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही टेबलवर पेन स्टँड बनवू शकता. यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तेलाची बाटली धुवावी लागेल आणि नंतर ती पूर्णपणे वाळवावी लागेल. नंतर तुम्ही बाटलीला मधोमध सहजपणे कापू शकता आणि पॅन स्टँड म्हणून वापरू शकता.

  • झाड लावावे

मोहरीच्या रिकाम्या बाटलीचा वापर तुम्ही रोपे लावण्यासाठी करू शकता. तुम्हाला फक्त बाटलीचा मधला भाग कापायचा आहे आणि नंतर त्यात रोप लावायचे आहे. ही बाटली घरामध्ये आणि बागेतही वापरली जाऊ शकते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाटलीला पेंटिंग करून एक खास लुक देखील देऊ शकता. 

  • शोपीस बनवावे

मोहरीच्या रिकाम्या तेलाच्या बाटलीतूनही तुम्ही शोपीस तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तेलाची रिकामी बाटली घ्यावी लागेल आणि ती कागदाने किंवा पेंटचा वापर करून डिझाइन तयार करू शकता. असे केल्याने कमी खर्चात तुमचे शोपीस तयार होईल.

  • वस्तू ठेवण्यासाठी वापर

तुम्ही मोहरीच्या जुन्या बाटल्यांमध्येही वस्तू ठेवू शकता. जर तुम्ही जुनी बाटली पक्ष्यांच्या खाद्यासाठी वापरू शकता. तुम्हाला वेगळा बॉक्स विकत घ्यावा लागणार नाही .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT