Restaurants In Goa: 'राईथ' नव्या जुन्याचा संगम
Restaurants In Goa: 'राईथ' नव्या जुन्याचा संगम Dainik Gomanrak
लाइफस्टाइल

Restaurants In Goa: 'राईथ' नव्या जुन्याचा संगम

Suhasini Prabhugaokar

उत्तर गोव्यातील (North Goa) समुद्रकिना जंग जवळील गावात फिरताना अनेकदा वाटतं की आपण गोव्यात नाही तर कुठेतरी वेगळ्याच प्रदेशात आहोत. आजूबाजूला फिरणारे पर्यटक, आरामात सैलावून पसरलेले विदेशी पर्यटक (Tourism) यांच्यामुळे या गावांचे दैनंदिन व्यवहार बदलून गेले आहेत. पूर्वी इथे जेवायला - चहा घ्यायला फारसे पर्याय नव्हते. आता डोळे दिपतील असे असंख्य पर्याय या भागात उपलब्ध आहेत. गोव्यात राहून आपल्याला या भागात कोणती हॉटेल्स - रेस्टोरंट आहेत, हे माहित नसतं. पण गोव्याबाहेरून येणाऱ्या मित्रमंडळींना मात्र इथल्या रेटॉरन्ट्सची पुरेपूर माहिती असते आणि अशा मित्रमंडळींना समुद्र किनारे प्रचंड आवडतात. मध्यंतरी मुंबई (Mumbai) वरून एक मैत्रीण आली होती. ती आली की समुद्रकिनाऱ्या जवळच्या एखाद्या हॉटेलमध्ये तिचा मुक्काम असतो. तिच्याकडून त्या भागातील नवनवीन रेस्टोरंन्टची (Restaurants In Goa) माहिती मिळत असते. यावेळी तिच्यामुळे वागातोरमधलं एक वेगळंच रेस्टोरंन्ट समजलं. गेल्या काही वर्षात वागातोरचा चेहरा मोहरा बदलून गेलाय. तो तिथे गेल्यावर डोळ्यांना जाणवत होता. डिसेंबर महिन्यात तर इथे पाय ठेवायला जागा नसते इतकी पर्यटकांची गर्दी होते. पूर्वी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच याभागात रेस्टोरंट होती. पण आता वागातोरला देशी - विदेशी अशी असंख्य प्रकारची रेस्टोरंट आहेत.

चित्र - विचित्र नावाची अनेक रेस्टोरंट वागातोर भागात दिसतात. काही महिन्यांपूर्वी वागातोरला 'राईथ' नावाचं रेस्टोरंट सुरू झालं. 'राईथ' नावापासूनच वेगळं वाटलं म्हणून आधी त्याचा अर्थ विचारून घेतला. 'राईथ' म्हणजे कायाकल्प, ताजेतवाने. हा ताजेपणा राईथमधील वातावरणात सामावलेला आहे. इथल्या सर्वच रेस्टोरन्टमध्ये संगीत हा अविभाज्य भाग बनला आहे. राईथमध्ये शिरताना कानाला पहिलं जाणवलं ते कर्णमधुर संगीत. पार्टीसाठी, गेट-टुगेदर साठी ही जागा छान आहे. कांदोळीमधील ' बॉम्बे अड्डा ' या प्रसिद्ध रेस्टोरंन्टच्या संस्थापकांनी वागातोरमध्ये राईथ सुरु केलंय. याच सगळ्या मंडळींची मुंबईमध्येही वेगवेगळी रेस्टोरंट आहेत. त्यांच्या प्रत्येक रेस्टोरंटचा मेनू हा वेगळा आहे. कोणतीतरी संकल्पना घेऊन त्यावर आधारित रेस्टोरेन्टची निर्मिती केली आहे.

राईथमध्ये तरुणाई जास्त दिसते. इथलं वातावरण, संगीत खास त्यांच्यासाठीच तयार करण्यात आलंय, असं वाटत राहतं. राईथमध्ये गेले असता तिथे मालक अनुज चुघ यांच्याशी बोलायला मिळालं. राईथ का सुरु केलं? यावर त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की गोव्याच्या जीवनशैलीचे लक्षण असलेल्या तीन पैलूंवर प्रकाश टाकणारी एक अनोखी संकल्पना आम्हाला नव्या रेस्टोरन्टमध्ये उतरवायची होती. राईथ त्यासाठी अगदी योग्य वाटलं. 'भरपूर खा, आराम करा आणि मनोरंजन करा' गोव्याच्या या तीन वैशिष्ट्यांवर आम्ही भर दिला. पर्यटक देखील गोव्यात याचसाठी येतात. इथे आल्यावर त्यांना या तिन्ही गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत, यासाठी राईथची निर्मिती केली आहे.

इथलं वातावरण, संगीत हेच फक्त वैशिष्ट्यपूर्ण नाही तर इथले पदार्थ देखील वेगळेच आहेत. गोवन आणि कॉंटिनेंटल यांचं थोडंसं मिश्रण असलेला मेनू इथे आहे. हल्ली 'बार्बेक्यू' प्रकारची फारच चलती आहे. समुद्रकिनारी बसून गरम गरम बार्बेक्यू मधले वेगवेगळे पदार्थ खाण्यातली मजा इथे अनुभवता येते. याशिवाय लाकडाच्या भट्टीतील पिझ्झा, पास्ता - रिसातो, ग्रील्ड सी फूड, असंख्य प्रकारची सॅलड्सचे प्रकार आहेत. गोमंतकीय खाद्य जीवनात 'पोळी'ला एक वेगळं महत्व आहे. अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणासाठी पोळी घेतली जाते. तर या पोळीला राईथमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे परोसण्यात येतं. ही पोळी कधी मशरूम शाकुतीसोबत तर कधी ग्रील्ड चिकन सोबत, कधी खिमाबरोबर तर कधी मलबारी मटणबरोबर, कधी कालवांच्या तोणाकाबरोबर तर कधी गोवन चोरीसबरोबर अतिशय सुंदरपणे परोसण्यात येते. इथे केळ्याच्या पानात आणि मोहरीच्या मसाल्यात छान खरपूस भाजलेला मिळणारा बांगडा - पापलेट अगदी न चुकता खाण्यासारखा पदार्थ आहे. मासळीचा मसाला आणि त्याची केळीच्या पानात भाजण्याची ही बंगाली पद्धत. असं कधी तरी वेगळ्या पद्धतीने मासळी खाऊन बघायला काही हरकत नाही.

लोकप्रिय स्थानिक पदार्थाना एक थोडंसं वेगळं रूप देऊन ते खवय्यांसमोर सादर करण्याची कला इथल्या शेफ्सनी साध्य‌ केली आहे. आपण घरी बनवतो तोच पदार्थ पण तो राईथमधील शेफ जेव्हा अतिशय नजाकतीने आपल्या समोर आणून ठेवतो तेव्हा तो पदार्थ अतिशय वेगळाच वाटू लागतो. मेडिटरेनियन (भूमध्यसागरी) पदार्थ बनवण्याची पद्धत इथले शेफ्स वापरतात. त्यामुळे ग्रिल्ड - बार्बेक्यू अशा पद्धतीने बनवलेले पदार्थ इथे खायला मिळतात. एकाच छताखाली बसून मेडिटरेनियन, इटालियन, गोवन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची चव चाखता येते. भूमध्यसागरीय ते ग्रिल्स पदार्थ, वुड फायर पिझ्झा आणि विविध प्रकारचे घरगुती सॉस या सर्वांच्या चवीला तोड नाही, शिवाय त्यांच्या आकर्षक सादरीकरणामुळे तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. गोवा ही समुद्रीय खाद्यपदार्थांची भूमी आहे आणि राईथमध्ये सीफूड अतिशय वेगळ्या पद्धतीने शिजवलं जातं. पण म्हणून शाकाहारी लोकांवर इथे अन्याय होईल असं नाही. त्यांच्यासाठी देखील अनेक पर्याय आहेत. नारंगी कोफ्ता करी, एक गोड तिखट आणि मँडरीन चवीची करी, भाजी आणि कॅबेज चीज कोफ्त्यासह, नानसोबत खायला चांगले लागतात. नेहमी तेच जेवण जेवून कंटाळा येतो. अशा वेळी थोडासा बदल म्हणून असे पदार्थ बरे वाटतात. डिसेंबर महिन्यात गोव्यात येणाऱ्या मित्रमंडळींना कोणत्या वेगळ्या ठिकाणी जेवायला घेऊन जायचं हा प्रश्न असतो. थोडंसं आड वळणावरच्या वाटेवर राईथसारखे वेगळे पर्याय नक्कीच सापडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT