Irregular Periods: मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याचा त्रास महिलांना दर महिन्याला सहन करावा लागतो. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना खूप धोकादायक असते. ज्यामुळे महिलांना चिडचिड, पाठदुखी, पोटदुखी आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीदरम्यान महिलांनी पोषक आहार घ्यावा आणि आराम करावा.
जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात असे म्हटले आहे की ज्या महिला रात्री सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना जास्त रक्तस्त्राव किंवा अनियमित मासिक पाळीच्या समस्येला सामोरे जावे लागते.तसेच ज्या महिला सात ते आठ तास झोपतात त्यांच्या तुलनेत कमी झोप घेणाऱ्या महिलांना मासिक पाळी अनियमित होण्याची शक्यता 44 टक्के आणि 70 टक्के जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
संशोधनात काय खुलासा झाला?
जर्नल ऑफ स्लीप पुढे म्हणाले की त्यांनी 24 ते 40 वर्षे वयोगटातील सुमारे 574 महिलांचा पीरियड सायकल अभ्यास केला. जास्त रक्तस्त्राव किंवा नियमित मासिक पाळीच्या दरम्यान त्यांचा संपूर्ण दिवस कसा जातो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अभ्यासात असे आढळून आले की ज्या महिलांना जास्त रक्तस्त्राव आणि अनियमित मासिक पाळी येत होती त्यांना दिवसभर काम करताना थकवा, झोप आणि डोकेदुखी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
PMS म्हणजे काय?
मासिक पाळी दरम्यान थकवा येणे, चिडचिड होणे, राग येणे यासारख्या समस्या जाणवतात. यालाच प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात. प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोममध्ये तणाव, मुड खराब होणे, अपुरी झोप यासारखी लक्षण दिसतात. अपुऱ्या झोपेमुळे मासिक पाळीतील वेदना अदिक वाढतात. ज्यामुळे प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा धोका वाढतो.
झोपेची वेळ ठरवावी
जर तुम्ही दररोज झोपेची एकच वेळ ठेवली तर मासिक पाळी आरोग्यावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे दररोज वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा.
मेडिटेशन करावा
झोपण्यापूर्वी तुम्ही दीर्घ आणि खोल श्वास घेऊ शकता. तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि सोपा योग करू शकता. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या चांगले वाटेल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.
हीट थेरेपी
जर तुम्हाला झोपताना खूप क्रॅम्प येत असतील तर तुम्ही हीट थेरपी वापरावी. झोपण्यापूर्वी आपण हीटिंग पॅड वापरावे किंवा झोपण्यापूर्वी आपण शरीर पूर्णपणे रिलॅक्स केले पाहिजे. जेणेकरून वेदना थोडी कमी होईल आणि आपण सहज झोपू शकाल.
हायड्रेट राहावे
तुम्ही दिवसभर स्वतःला हायड्रेटेड ठेवले पाहिजे. यासाठी भरपुर पाणी प्यावे. यामुळे तुमची अस्वस्थता कमी होऊ शकते आणि तुमचे पोट फुगलेले जाणवणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.