Tricolor Bangles For Republic Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tricolor Bangles For Republic Day: प्रजासत्ताकदिनी बांगडीचे 'हे' नवे डिझाइन नक्की ट्राय करा

Tricolor Bangles For Republic Day: बांगडीचे डिझाईन सिलेक्ट करताना तळहाताचा आकार लक्षात घेऊन त्यानुसार बांगडीचा सेट तयार करावा.

Puja Bonkile

Tricolor Bangles For Republic Day: कोणताही लूक स्टायलिश दिसण्यासाठी त्याच्या स्टाइलची खास काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या लूकनुसार अनेक गोष्टी खरेदी करतो. प्रजासत्ताकदिनी हटके दिसण्यासाठी पांढरा ड्रेस किंवा साडीसोबत तिरंगी बांगड्या घालू शकता.

तिरंगी मोत्याच्या बांगड्या

तुम्ही तिरंग्याच्या रंगात बांगड्यांचा सेट तयार करू शकता. केशरी,पांढरा आणि हिरव्या रंगाच्या मोत्याच्या बांगड्यांचा सेट तयार करू शकता. या बांगड्या बाजारात 200 रुपयांपर्यंत मिळतील. पारंपारिक लुकसोबतच या प्रकारच्या बांगड्यांचा सेट तुमच्या लूकमध्ये भर टाकेल.

कलरफुल ट्राय कलर बांगड्या

जर तुम्ही साध्या डिझाईन केलेल्या बांगड्या घातल्या असाल तर अशा रंगीबेरंगी बांगड्यांच्या साहाय्याने बांगड्यांचा सेट बनवून त्या तुमच्या हातात घालू शकता. आर्टिफिशियल डिझाईनमधील अशा प्रकारचे ब्रेसलेट तुम्हाला बाजारात जवळपास 150 ते 350 रुपयांना सहज मिळतील. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार घालू शकता.

रेशीम वर्क असलेली डिझाइन

जर तुम्हाला इंडो-वेस्टर्न किंवा वेस्टर्न लूक असलेला बांगडीचा सेट घालायचा असेल, तर तुम्ही अशा प्रकारच्या धाग्याने डिझाइन केलेली बांगडी किंवा साध्या बांगडीसह बांगडी सेट करू शकता.

प्रजासत्ताक दिनासाठी बांगड्यांची डिझाइन

जर तुम्ही तुमच्या मनगटावर देशाचा तिरंगा सजवण्याचा विचार करत असाल तर अशा प्रकारे तुम्ही तिरंग्याच्या चरख्यासोबत तिरंगी बांगड्या घालू शकता. म्हणजे निळ्या रंगाचे मध्यम रुंदीचे ब्रेसलेट. इंडो-वेस्टर्न, वेस्टर्न किंवा पारंपारिक अशा सर्व प्रकारच्या लूकसह या प्रकारची बांगडी उत्तम दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT