Republic Day Outfits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Republic Day Outfits: तुम्हालाही 'रिपब्लिक डे' ला दिसायचे हटके अशी कॅरी करा ओढणी

Republic Day Outfits: जर तुम्ही प्रजासत्ताक दिनी स्टायलिश दिसण्यासाठी कुर्तीवर ओढणी कॅरी करत असाल तर ही ट्रिप नक्की वापरून पाहा

Puja Bonkile

Republic Day Outfits: प्रजासत्ताक दिनाची सर्वत्र तयारी अगोदरच सुरू झाली आहे. त्या दिवशी खास दिसण्यासाठी लोक स्वतःसाठी अगोदरच कपडे खरेदी करतात. या दिवशी, काही लोक साडीत दिसतात तर काहींना सूट घालायला आवडते. तुम्ही कुर्ती घालत असाल आणि त्यावर कोणती ओढणी घ्यावी असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

कुर्तीसोबत ओढणी

जर तुम्ही केशरी रंगाची कुर्ती घातली असेल तर तुम्ही त्यासोबत ब्लॉक प्रिंटची ओडणी घेऊ शकता. हे कॉटन फॅब्रिकपासून बनलेले असल्यामुळे तुम्ही अधिक स्टायलिश दिसाल. अशी ओढणी बाजारात सहज मिळतात.

व्हाईट अनारकली ड्रेस

जर तुम्ही अनारकली सूट घालत असाल तर त्यासोबत मॅचिंग दुपट्टा घेण्याऐवजी बांधणी प्रिंटमधील ओढणी कॅरी करावी. यामध्ये तुम्ही गुलाबी आणि केशरी, केशरी आणि हिरवा किंवा हिरव्या आणि पांढर्‍या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये ओढणी घेऊ शकता. या प्रकारच्या कुर्तीसोबत हे दुपट्टे खूप छान दिसतील. तुम्‍हाला हवं असल्‍यास त्‍यामध्‍ये तुम्‍ही मोठी बांधणी प्रिंट घेऊ शकता जी खूप छान दिसेल.

ड्राय प्रिंट ओढणी

जर तुम्ही स्ट्रेट पँटसोबत कुर्ती घातली असेल आणि ती हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाची असेल, तर तुम्ही त्यासोबत नारिंगी टच असलेला दुपट्टा घेऊ शकता. यामध्ये तुम्ही ड्राय प्रिंट ओढणी किंवा वेव्ह प्रिंट ओढणी यांच्या कॉम्बिनेशनने स्टाइल करू शकता. हे खूप सुंदर दिसेल. तुम्हाला या प्रकारची ओढणी बाजारात १०० रूपयापासून मिळेल.

बनारसी ओढणी

तुम्ही पांढऱ्या कुर्तीवर बनारसी ओढणी घेऊ शकता. यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT