Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: तुमचा पार्टनर अपसेट असेल तर 'या' गोष्टी अजिबात करू नका

एखाद्या गोष्टीला घेऊन तुमचा पार्टनर जर अपसेट असेल तर त्याच्यासोबत कसे वागावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Relationship Tips: जर तुमचा पार्टनर एखाद्या गोष्टीवर अपसेट असेल किंवा रागावला असेल तर त्याला वारंवार कारण विचारून चिडवु नका. यामुळे समोरच्या व्यक्तीचा मूड जास्त खराब होऊ शकतो. कधी कधी रागाच्या भरात ती व्यक्ती असे काही करते ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला दुखापत होऊ शकते. त्याचा परिणाम तुमच्या नात्यावरही दिसून येतो. त्यामुळे रागाच्या भरात किंवा अपसेट झालेल्या जोडीदाराशी कसे वागावे हे जाणून घेऊया.

स्पेस द्या

जर तुमचा पार्टनर अपसेट असेल तर त्याला थोडावेळ द्यावा. तसेच स्पेस दिल्याने व्यक्तीला विचार करण्याची संधी मिळते. ज्यामुळे मुड चांगला होण्यास मदत मिळते.

म्हणणे ऐकावे

जर तुमचा जोडीदार अपसेट असेल किंवा रागावलेला असेल तर ही ट्रिक वापरू शकता. तुम्हाला राग येण्याचे कारण जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याशी वाद न घालता त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे.

चिडवू नका

राग शांत करण्याऐवजी वाढेल असे कोणतेही काम करू नका. फोनवर मोठ्याने बोलणे, जास्त आवाजात टीव्ही चालू करणे किंवा विनाकारण हसणे अशा अनेक गोष्टींमुळे इच्छा नसतानाही समोरच्याचा राग वाढू शकतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीबद्दल रागावलेला किंवा अपसेट असेल तर त्याचा मुड चांगला करण्यासाठी त्याला विनाकारक त्रास देऊ नका. उलट त्याला स्पेस द्या किंवा त्याचे म्हणणे शांतपणे ऐकावे.

कॉफी डेटला जा

जर तुमचा जोडीदार रागावला असेल किंवा अपसेट असेल तर त्याचा मुड चांगला करण्यासाठी वर सांगितलेल्या टिप्स ट्राय करू शकता. तसेच तुम्ही कॉफी डेटवर देखील जावू शकता. यामुळे पार्टनरचा मुड चांगला होऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT