Healthy Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: हे बदल स्विकारल्यानंतर वैवाहिक जीवन होते यशस्वी

लग्नानंतर प्रत्येक जोडप्यामध्ये नेमके काय बदल होतात ?

Sumit Tambekar

एकमेकांना लाईक करणारी जोडपी काही कालावधीनंतर लग्नाचा विचार करत आपलं रिलेशन कायम ठेवण्यासाठी लग्नाच्या बेडीत अडकतात. यानंतर मात्र कायम असणाऱ्या काही सवयी मात्र बदलतात. या स्थितीत नेमक्या सवयी बदलतात. यामूळे प्रत्येक विवाहित जोडप्याचे लग्न होताच त्यांच्या आयुष्यात कोणते बदल होतात ते जाणून घेऊया. (Relationship tips these things change in the life of every couple they get married)

लग्नानंतर आयुष्य कसे बदलते ? लग्नानंतर प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. हे बदल कधी हृदयाला सुखावणारे असतात तर कधी डोळ्यात पाणी येणारे असतात. ज्याचा सामना प्रत्येक विवाहित जोडप्याला करावा लागतो. बदलाचे हे निकष पार केल्यानंतरच प्रत्येक वैवाहिक जीवन यशस्वी होते.

लग्नानंतर प्रत्येक जोडप्यामध्ये नेमके काय बदल होतात ?

प्रेम हे केवळ गुणांवर नाही तर दोषांवर ही करावे लागेल

काही वेळा दूर राहून, जी व्यक्ती तुम्हाला आकर्षणाची मूर्ती वाटते. कधी लग्नानंतर उलटेही होऊ शकते. आयुष्य तितकं सोपं आणि सुंदर नसतं जेवढं तुम्ही विचार करता, अशा परिस्थितीत लग्नानंतर काही दिवसांनी तुम्हाला समजतं की तुम्हाला तुमच्या जोडीदाराची बलस्थानेच नाही तर त्याच्या दोषांचाही स्वीकार करून आयुष्यात पुढे जावं लागेल.

छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व कळू लागते

तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व कळू लागते. तुम्हा दोघांनाही समजू लागते की, खऱ्या आयुष्यात थँक्यू, प्लीज सारख्या छोट्या शब्दांचे महत्त्व किती मोठे आहे. लग्नाआधी तुम्हाला स्वतःचं ऐकायला आवडायचं, तर लग्नानंतर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं कौतुक करण्याचं कौशल्यही कळतं.

दिनचर्येत होतो बदल

लग्नानंतर जबाबदारीची जाणीव होते. त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते त्यांच्या पूर्वीच्या दिनचर्येत आणि सवयींमध्ये खूप बदल करतात. तुम्ही वेळेनुसार जबाबदार बनता आणि जबाबदाऱ्या वाटायलाही शिका.

प्राधान्यक्रमात होतो बदल

बदल- लग्नानंतर बहुतेक लोकांच्या प्राधान्यक्रमात बदल होतो. पूर्वी मित्र आणि ऑफिस हे आपले प्राधान्य असायचे, पण लग्नानंतर आयुष्याचा जोडीदार खर्‍या अर्थाने प्रायॉरिटी बनतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT