Relationship Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'Go With The Flow' म्हणायची वेळ संपलीये का?

Relationship Tips in Marathi: आपण 'चाललंय तसं चालू दे' असं म्हणून नात्याची गाडी पुढे नेतो आणि गोंधळात सापडतो, चालू द्यायचं पण कितीवेळ आणि नेमकं कुठेपर्यंत. याचं उत्तर काय?

Akshata Chhatre

Relationship Tips in Marathi:

पणजी : तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही तुमच्या नात्यात दिशाहीनपणे पुढे चाललं आहे, तुम्ही फक्त परिस्थितीनुसार निर्णय घेताय आणि यामध्ये तुम्हाला नेमकं काय हवंय हेच तुम्ही विसरत चाललाय?

जर तुम्हालाही असं वाटत असेल, सर्वात आधी म्हणजे घाबरू नका, कारण असं वाटणारे तुम्ही तुम्ही एकटे नाहीत. अनेकवेळा नात्यात एक असा टप्पा येतो जेव्हा आपण 'चाललंय तसं चालू दे' असं म्हणून नात्याची गाडी पुढे नेतो आणि गोंधळात सापडतो, चालू द्यायचं पण कितीवेळ आणि नेमकं कुठेपर्यंत याचं उत्तर काय?

नात्याची सुरुवात:

एखादं नातं सुरु होत असताना सगळंच खूप छान वाटत असतं, नातेसंबंधांमध्ये उत्सुकता असते. अशावेळी परिस्थितीला जसं आहे तसं स्वीकारणं किंवा 'चाललंय तसं चालू दे' अशी भावना तात्पुरती निर्माण होऊ शकते पण वेळ जसजशी पुढे जाते, तसतसं हाच दृष्टिकोन तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो.

'चाललंय तसं चालू दे' हा दृष्टिकोन अनेकवेळा एक्सटेर्नल फॅक्टर्सवर आधारित असतो. म्हणजेच, नात्याचा प्रवाह आपल्या जोडीदार किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. तात्पुरता हा दृष्टिकोन सोयीस्कर वाटत असला तरीही दीर्घकाळात यामुळे असहाय्यतेची भावना किंवा असमाधान वाटू शकतं.

'चाललंय तसं चालू दे' हा दृष्टिकोन सोडण्याची वेळ आली आहे का?

  • तुम्ही तुमची ओळख हरवताय: तुम्हाला तुमची स्वतःची ओळख हरवतेय असं वाटतंय का? तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराच्या किंवा नात्याच्या गरजांसाठी स्वतःच्या इच्छांना दुर्लक्षित करताय का?

  • सतत नाराज असता का? जर तुम्हाला नेहमीच नाराजी किंवा असमाधान वाटतंय, तर कदाचित तुम्ही तुमच्या नात्यात जे चाललंय त्याकडे लक्ष देत नाही आहात.

  • संवाद कमी होतोय का? तुमच्या नात्यामध्ये अनेकवेळा गोष्टी कठीण बनतायत का? असं असल्यास, गैरसमज वाढण्याची शक्यता असते.

यावर उपाय काय?

  • तुमच्या गरजांचा शोध घ्या: तुमच्या गरजा, अपेक्षा आणि स्वप्नं काय आहेत यावर विचार करा.

  • संवाद साधा: तुमच्या जोडीदाराशी तुमच्या भावना, गरजा आणि अपेक्षा मोकळेपणाने मांडा. आणि त्यांच्या दृष्टिकोनही समजून घ्या.

  • मर्यादा ठेवा: एखादं नातं चांगलं बहरायचं असेल तर त्या नात्यात काही मर्यादा आवश्यक असतात, यामुळे तुम्हाला तुमची ओळख टिकवता येते.

  • जबाबदारी स्विकारा: तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्या. तुमच्या नात्यामधून मिळणारं सुख किंवा दुःख फक्त परिस्थितीवर सोडून देऊ नका.

'चाललंय तसं चालू दे' हा दृष्टिकोन कधी कधी योग्य असतो खरा पण कायमच त्यावर अवलंबून राहणं हे तुमच्या नात्यासाठी योग्य नाही. संवाद, मर्यादा आणि जबाबदारी यांच्या आधारे नात्याचा प्रवाह नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्यास मात्र शहाणपणा ठरेल. नातेसंबंध म्हणजे दोघांमधला समतोल आहे आणि अशात आपल्या नात्याला प्रवाहावर सोडून देण्यापेक्षा जबाबदारी घेत पुढे जाणं महत्वाचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT