Relationship Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: गर्लफ्रेंडला 'या' गोष्टी विचारल्यास येऊ शकतो दुरावा

सध्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टींमुळेही दूरावा येतो. यामुळे रिलेशनमध्ये असतांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये असणे ही एक सुंदर गोष्ट आहे. एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांच्या गोष्टी समजून घेणे, एकमेकांसह वेळ घालवणे अशा अनेक गोष्टी असतात.

त्याचसह छोटे-छोटे वाद, भांडण नात्यातील गोडवा वाढवतात. पण अनेकवेळा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नात्यात दुरावा येउ शकतो. हे घडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण बोलण्यापूर्वी विचार करत नाही आणि ज्याचे तुमच्या जोडीदाराला वाईट वाटू शकते. यामुळे बोलतांना किंवा कोणत्या गोष्टी विचारतांना काळजी घेणे गरजेचे आहे.

  • मित्रांबद्दल विचारपुस

सध्या प्रत्येक व्यक्तीला मित्र आणि मैत्रीणी असतातच. यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनपकडून तिच्या मित्रांबद्दल माहिती विचारु नका किंवा तिला त्यांना भेटण्यापासून अडवणूक करु नका. असे केल्यास नात्यात दूरावा येउ शकतो.

  • सोशल मीडियाचा किंवा मोबाइलचा पासवर्ड्स

आजच्या आधूननिक युगात मोबाईल (Mobile) आणि सोशल मीडिया (Social Media) सर्वच वापरतात. जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला तिचा मोबाईल पासवर्ड किंवा सोशल मीडिया पासवर्ड विचारत असाल तर त्यामुळे तुमच्या पार्टनरला वाटेल की तुम्ही त्यांच्यावर संशय घेत आहात. याचा विपरित परिणाम तुमच्या नात्यावर पडू शकतो.

  • खर्चाबद्दल

गर्लफ्रेंडला कधीच विचारू नका की तिला किती पगार आहे किंवा किती पॉकेटमनी मिळतो. असे केल्याने तुमच्या जोडीदाराला असे वाटू शकते की तुमची नजर त्यांच्या पैशावर आहे किंवा तुम्हाला त्यांचा खर्च टाळायचा आहे. याचा नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

  • एक्स बद्दल

तुमच्या गर्लफ्रेंडला तिच्या भूतकाळाबद्दल तोपर्यंत विचारू नका, जोपर्यंत ती याविषयी बोलायला कम्फर्टेबल होत नाही. जर तुम्हाला तुमचे नाते पुढे न्यायचे असेल, तर तुमच्या गर्लफ्रेंडला तिच्या एक्स बद्दल विचारणे टाळा किंवा काही काळ प्रतीक्षा करा.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT