Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: 'या' कारणांमुळे स्वत:च्याच बायकोवर चिडतात नवरे

अनेक नवरे आपल्या बायकोवर चिडचिड करतात. यामागे कोणती कारणे असु शकतात हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Relationship Tips: कोणतही नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकुन असते. नातं टिकवून ठेवण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण अनेक वर्ष एकत्र राहूनही काही लग्नं टिकून राहत नाही.  यामागे अनेक कारणे असू शकतात, पण काही वेळा नात्यात कटुता निर्माण करण्याचे काम नवराच करत असतो. त्याची स्वतःच्या बायकोवर चिडचिड होऊ लागते. असे का घडते याची काही कारणे पुढे दिलेली आहे.

  • बायकोचे यश

पुरुषांना नेहमीच घरचा प्रमुख बोलले जाते. जेव्हा पत्नी काम करत असते आणि त्याच्यापेक्षा जास्त कमावते तेव्हा अनेक पुरुषांचा अहंकार दुखावतो. यामुळे तो विनाकारण आपल्या पत्नीवर रागावू लागतो आणि तिला अपमानित करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये तिच्यात दोष शोधू लागतो. 'जास्त उडू नकोस', 'तुम्ही चार पैसे जास्त का मिळवायला सुरुवात केली आहे?', अशा पैशांच्या मुद्द्यावर बायकोला टोमणे मारायला अशी माणसे मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे देखाल नातं तुटू शकते.

  • संशय

संशयास्पद स्वभावाचे पुरुष आपल्या पत्नीला कोणाच्याही जवळ जाताना पाहू शकत नाहीत. त्यांच्याकडे कोणी थोडे अधिक लक्ष दिले तरी अशा नवर्‍यांचे विषारी स्वरूप दिसून येते. संशयास्पद असल्याने तो आपल्या पत्नीचा मानसिक आणि भावनिक छळ करू लागतो आणि नेहमी चिडचिडीच्या मनस्थितीत असतो.

  • अफेअर

जेव्हा दुसरी स्त्री त्याच्या आयुष्यात येते, तेव्हा पुरुष तिला सर्वात जास्त आवडू लागतो. त्याच्यापुढे प्रत्येक सुख-दु:खात साथ देणारी त्याची पत्नी हीन वाटू लागते. त्यामुळे त्यांची त्याच्यावर चिडचिड होऊ लागते आणि घरात रोजच वाद होतात. यामुळे देखील नातं टिकून राहत नाही.

  • कुटुंबातील सदस्यांचे पालन करणे

अनेक वेळा घरातील सदस्यच दोघांमधील नातं बिघडवतात. नकारात्मक विचारांनी भरलेल्या लोकांमध्ये कधीही सकारात्मकता दिसत नाही. जर एखाद्या पुरुषाला त्याच्या बायकोबद्दल वाईट सांगितले तर तो त्यावर विश्वास ठेऊन तिच्याशी कटुतेने वागु लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT