Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship: नात्यात या गोष्टी चुकूनही ॲडजस्ट करु नका...नाहीतर सगळंच गमावून बसाल

नात्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच ॲडजस्ट करु नये.

दैनिक गोमन्तक

Relationship Tips: कोणत्याही नात्यात दोन व्यक्तींचे विचार हे वेगवेगळे असतात. त्यामुळे कधीना कधी ॲडजस्टमेट करावीच लागते. काही ना काही बाबतीत तुमचे विचार तुमच्या जोडीदारापेक्षा वेगळी असू शकते.

त्यामुळे एकमेकांच्या मताचा आदर करणे गरजेचे असते. पण ॲडजस्टमेंट व्यतिरिक्त अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्यासाठी ॲडजस्ट करणे किंवा सहन करणे चांगले नाही. अशावेळी आपण या गोष्टी ॲडजस्ट करणे टाळले पाहिजे.

  • जोडीदाराचा अपमान करणे

पाहुण्यासमोर मस्करीच्या नावाखाली जोडीदाराचा अपमान करण्याची अनेकांना सवय असते. तर काही लोक आपल्या जोडीदाराला टोमणे मारण्यात किंवा त्यांचा पाणउतारा करण्यास मागेपुढे पाहत नाही. ही गोष्ट नेहमी ॲडजस्ट केल्याने तुमच्या आत राग साठत जाईल. यामुळे नात्यात दुरावा येउ शकतो.

  • रिलेशनशिप लपवून ठेवणे

जर तुमच्या जोडीदाराला हे नाते सर्वांपासून लपवून ठेवायचे असेल तर तुम्ही ते जुळवून घेऊ नका. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास तर कमी होईलच पण नात्यातील विश्वासही कमी होईल.

  • तुम्हाला कमी लेखणे

तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग असाल, दोन्ही बाबतीत तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. ओळख फक्त पैसे कमवून बनत नाही. जर तुमचा जोडीदार तुमच्या करिअरला काही महत्त्व देत नसेल, तर ही गोष्ट त्याला उघडपणे सांगा आणि ॲडजस्ट करू नका.

  • चुकीच्या गोष्टींबद्दल शांत राहणे

जर तुम्ही एकत्र कुटूंबात राहत असाल तर, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडणे होतात. अशावेळी जर तुमचा पार्टनर प्रत्येक वेळी चुकीच्या लोकांचे समर्थन करून गप्प बसत असेल किंवा तुम्हाला गप्प राहण्याचा सल्ला देत असेल तर ते तुमच्या आणि तुमच्या नात्यासाठी योग्य नाही. जोडीदाराने आपल्या पार्टनरसाठी स्टँड घेणे खूप महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनीची उलटी चाल ठरणार निर्णायक! 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, तर काहींना होऊ शकतो आर्थिक फटका

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT