Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship: प्रेम, नातं अन् सुखी वैवाहिक जीवनासाठी फेंगशुई काय सांगतं...

फेंगशुईमध्ये बेडरूमसंदर्भात काही खास गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी होऊ शकते.

Puja Bonkile

Relationship: कोणत्याही नात्याला आपल्या जीवनात खास महत्त्व असतं. खरं तर प्रेम हा कोणत्याही नात्याचा पाया मानला जातो. विशेषत: जेव्हा तुमच्या जोडीदारासोबतच्या चांगल्या आणि गोड नातेसंबंधांचा विचार केला जातो तेव्हा केवळ प्रेमच ते पुढे नेण्यात मदत करू शकते.

पण अनेकवेळा वैवाहिक जीवनात वाद निर्माण होतात. यामुळे नात्यात देखील अंतर निर्माण होते. या सगळ्याचे कारण काहीही असो, काही वेळा तुमच्या घरातील वास्तू दोष देखील खराब नातं तुटण्यास कारणीभुत ठरू शकतं. फेंगशिई नियमांनुसार काही गोष्टींची काळजी घेतल्यास वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकतं.

बेडरूम स्वच्छ ठेवावी

जोडीदारालासोबत नातं टिकवण्यासाठी तुमची बेडरूम नेहमी स्वच्छ ठेवावी.  कोणतीही वस्तू तुटली असेल तर ती ताबडतोब आपल्या बेडरूममधून काढून टाकावी. असे मानले जाते अस्वच्छ बेडरूम तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण करू शकते. यामुळे बेडरूम नेहमी स्वच्छ ठेवावी.

बेडरूममध्ये आरसा लावू नका

बेडरूममध्ये चुकूनही आरसा लावू नका. काही कारणास्तव आरसा असला तरी तो बेडच्या समोर ठेवू नका. कारण यामुळे नात्यात दूरावा येऊ शकतो. झोपताना आरसा नेहमी कपड्याने झाकून ठेवावा. घराची बेडरूम फक्त विवाहित जोडप्यानीच वापरावी.

या रंगाचे कपडे घालावे

तुमच्या वैवाहिक जीवनात मतभेद कायम राहिल्यास तुम्हाला विशिष्ट रंगांचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे परस्पर प्रेम जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी लाल रंगाचे कपडे घालावे. लाल रंग हा प्रेमाचा प्रतिक मानला जातो.

फ्रेश फुल ठेवावी

बेडरूममध्ये सकारात्मकता राहण्यासाठी नेहमी फ्रेश फुलं ठेवावी. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम आणि रोमान्सची कमतरता जाणवणार नाही.

टिव्ही लावु नका

सुखी आनंदी वैवाहिक जीवनासाठी बेडरूममध्ये चुकूनही टिव्ही लावू नका. यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT