Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: लग्नाला कितीही वर्षे होऊ देत, पहिल्यासारखंच राहील प्रेम; जर नात्यात असतील 'या' गोष्टी

लग्नानंतर काही काळानंतर नवरा-बायकोच्या नात्यात कटूता येते. पण काही काळानंतर असं वाटतं की आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. अशावेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Relationship Tips: पती-पत्नीमधील नातं हे एकमेकांवरचं प्रेमं आणि विश्वासावर आधारित असते. जेव्हा दोन लोक या नात्यात असतात तेव्हा दोघांनाही काही छोट्या नियमांचे पालन करावे लागते. जे त्यांचे वैवाहिक नातं घट्ट करण्यास मदत करते. लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक असते. पती-पत्नीच्या नात्यात खूप उत्साह देखील असतो, पण काही काळानंतर हे नातं पूर्वीसारखे राहिलेले नाही असे वाटते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • एकमेकांचा काळजी घ्यावी

ज्या नात्यात एकमेकांची काळजी घेतली जाते त्यांचं नातं नेहमीच घट्ट राहतं. जितके तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तितके तुम्ही एकमेकांच्या जवळ जाल. तुम्ही एकमेकांशी बोलत राहणे आणि तुमच्या नात्यात दुरावा येण्याचे काही कारण आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

  • भावनिक जवळीक

जवळीक म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या जवळ असणे नाही तर भावनिक आणि मानसिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ असणे गरजेचे असते. नात्यातील विश्वास घट्ट ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदारासोबत शारिरिक जवळीक वाढवणे देखील खूप महत्वाचे असते. पण जर तुमच्या नात्यात भावनिक जोड नसेल तर ते जास्त काळ टिकणे कठीण होऊन बसते. अशावेळी जर तुम्हालाही तुमचे वैवाहिक जीवन पूर्वीसारखेच राहावे असे वाटत असेल, तर सर्वात पहिले तुमच्या पतीसोबत भावनिक जवळीक निर्माण करावी .

  • पर्सनल स्पेस द्यावी

टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला नेहमीच बांधून ठेवायचे असते. असे नातं जास्त वेळ टिकून राहत नाही. एक प्रेमळ जोडीदार केवळ त्याच्या जोडीदाराला मोकळ आणि आनंदी जगू देतो. तसेच त्याला पर्सनल स्पेस देखील देतो. यामुळे नातं दीर्घकाळ टिकून ठेवण्यसाठी एकमेकांना पर्सनल स्पेस देणे गरजेचे आहे.

  • जोडीदाराची आवडती डिश बनवावी

तुमचा जोडीदार तुमच्यावर कायम प्रेम करावे असे वाटत असले तर तुम्ही त्याच्यासाठी स्वतः आवडता पदार्थ बनवू शकता. यामुळे त्याला कळेल की तुम्ही त्याच्यासाठी किती खास आहात. त्यामुळे त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. जरी त्याने हे उघडपणे सांगितले नाही, तरीही तो हळूहळू तुमची काळजी घेऊ लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT